Poster Sakal
पुणे

चंद्रकांतदादा हिमालयात कधी जाताय? पाटलांच्या मतदारसंघात शिवसेनेची बॅनरबाजी

स्वत:च्या मतदारसंघात त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीत भाजपाचा पराभव झाल्यावर चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका होताना आपल्याला पहायला मिळत आहे. त्यांच्याविरोधात सोशल मीडियात मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. पुण्यातही स्वत:च्या मतदारसंघात त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

Poster

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीचा निकाल आज लागला. त्यामध्ये भाजपाच्या सत्यजित कदम यांचा पराभव झाला आहे. त्यांच्याविरोधात महाविकासआघाडीकडून कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका भाषणात कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक आपण हरलो तर हिमालयात जाणार असल्याचं वक्तव्य केलं होत. त्यानंतर आता या निवडणूकीत त्यांचा पराभव झाल्यावर लोकांनी त्यांच्यावर टीका करत मीम्स व्हायरल केले आहेत. चंद्रकांत पाटील हिमालयात कधी जाणार असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर त्यांचे हिमालयातील फोटो व्हायरल होत असून लोकांकडून त्यांना हिमालयात जाण्यासाठी मागणी केली जात आहे.

राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्या नावाचं हरिद्वारचं तिकीटही बुक करण्यात आलं आहे. त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही AC तिकीट बुक केलं आहे असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्याबरोबर पुण्यातही चंद्रकांतदादा हिमालयात कधी जाताय? अशा आशयाचे पोस्टर झळकले आहेत. युवासेना चे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश पळसकर यांनी हे पोस्टर चंद्रकांत पाटील यांचा पुण्यातील मतदारसंघ कोथरुडमध्ये लावले आहेत. निकालानंतर चंद्रकात पाटील हिमालयात जाण्यासाठी अनेकांनी त्यांच्यावर टीका केली असून शिवसेनेकडून त्यांना हिमालयात पाठवण्यासाठी एक व्हिडीओ बनवण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांना हिमालयात पाठवण्यासाठी तयारी करताना आपल्याला दिसत आहेत.

दरम्यान पराभवानंतर माध्यमांना बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमचे नाना कदम लढले, तर तुमच्या तोंडाला फेस आला आहे. मग मी लढलो तर काय होईल? असा प्रश्न करत त्यांच्या हिमालयात जाण्याच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना "मी लढलो आणि हरलो तर हिमालयात जाईल असं म्हटलं होतं." असं म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT