नाणोली - येथील शेतातील पोल्ट्री फार्म. 
पुणे

कोरोना व्हायरसच्या भीतीने मावळातील कुक्कुटपालन व्यवसाय संकटात

दक्ष काटकर

टाकवे बुद्रुक - मावळ तालुक्‍यातील गेल्या काही वर्षांपासून वाढत असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायाला कोरोना व्हायरसमुळे खीळ बसली आहे. चिकनमुळे हा आजार होत असल्याच्या पोस्ट छायाचित्रासह सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने पोल्ट्री व्यवसाय आर्थिक संकटात आला आहे.

मावळात ४६२ पोल्ट्री फार्म आहेत. त्यातील काही बहुतेक कुक्कुटपालन व्यावसायिक स्वतः पिल्ले विकत घेऊन ती मोठी करून विकतात तर काही वेंकिज, दुर्वेश, सुगुना, जम्बो, प्रीमिअर यांसारख्या कंपन्या जोडल्या आहेत. या कंपन्या कुक्कुटपालन व्यावसायिकांना पिल्ले आणून देते. त्यांचे खाद्य व औषधे पुरवतात. कोंबड्या ४५ दिवसांमध्ये दोन किलोपर्यंत झाल्यानंतर त्या घेऊन जातात. मात्र, एक ते दीड महिन्यापासून कोरोना व्हायरस हा चिकनमुळे होतो, अशा अफवा सुरू झाल्यानंतर खाणाऱ्यांनी त्याचा धसका घेतला आहे. कंपन्या व कोंबड्या विकणारे व्यावसायिक चिकनच्या दुकानात ८० ते ८५ किलो भावाने कोंबड्या विकत होते. आता त्या ३५ ते ४० किलो भावाने द्याव्या लागत आहे. त्यामुळे चिकनच्या भावात किलोमागे ४० ते ४५ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे कंपन्या तोट्यात चालल्या आहेत. तसेच शेतकरी व्यावसायिकही अडचणीत आले आहेत.

नाणोलीतील व्यावसायिक एकनाथ वाडेकर म्हणाले, ‘‘काही वर्षांपूर्वी बर्ड-फ्लूमुळेमुळे कुक्कुटपालन व्यावसायिक आर्थिक संकटात सापडला होता. आता त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने याबाबत जनजागृती करण्याची आवश्‍यकता आहे.’’
चिखलीतील दुर्वेश चिकन कंपनीचे व्यवस्थापक सचिन कामठे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या अफवेमुळे चिकणमध्ये निम्म्याने तोटा सहन करावा लागत आहे.’’

सोशल मीडियामुळे परिणाम
सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविल्या जाणाऱ्या अफवांमुळे या व्यावसायिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. येत्या काही दिवसांत हे चित्र सावरले नाही, तर हा व्यवसाय तग धरू शकणार नाही. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने व आरोग्य विभागाने जनजागृती करणे गरजेचे आहे, अशी मागणी कुक्कुटपालन व्यावसायिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT