विजेचा लपंडाव
विजेचा लपंडाव sakal
पुणे

वडगाव बुद्रुकमध्ये विजेचा लपंडाव

(व्हिडिओ: राजेंद्रकृष्ण कापसे)

खडकवासला : वडगाव बुद्रुक परिसरात विजेचा अनियमित पुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, वर्क फ्रॉम होम, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात (online education) अडथळे निर्माण होत आहेत. विजेच्या या खेळखंडोबामुळे नागरिक संतापले आहे. सिंहगड रस्ता (sinhgad road) वडगाव बुद्रुक येथील सर्व्हे नंबर ४८, छत्रपती संभाजी महाराजनगर, निवृत्तीनगर, दभाडी, चरवडवस्ती, शांताईनगर, रायगडनगर परिसरात विजेच्या या कारभारामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर परिणाम झाला आहे. (Power outage in Wadgaon Budruk)

पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहे. पाऊस नसतानादेखील विजेची ये- जा सुरू असते. वीज वारंवार खंडित होत आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे. कोरोना परिस्थितीमुळे अनेक कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत. विजेच्या अनियमतेमुळे त्यांच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. त्याचबरोबर मुलांच्या शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरूनच ऑनलाइन शिक्षण घेत आहे. त्यांचेदेखील विजेअभावी नुकसान होत आहे.

महावितरणचे कर्मचारी येऊन तात्पुरती दुरुस्ती केली जात असल्याचे डेझी डॅफोडिल्स को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष संदीप शितोळे यांनी सांगितले. पावसामुळे वीजपुरवठा यंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे. ही तांत्रिक बाब असू शकते. मात्र पूर्णपणे पाऊस गेल्यानंतरही दोन- दोन दिवस पुरवठा सुरळीत होत नाही.

त्यामुळे नक्कीच विद्युत विभागाच्या नियोजनात दोष दिसून येतो, तसेच विजेचा नेहमीच कमी किंवा अचानक वाढल्याने नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे मोठ्या प्रमाणात खराब होऊन मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे मारुती चरवड कॉलनीतील मुगुट पासलकर यांनी सांगितले.ट्रान्सफॉर्मर परिसरात वेली, झाडी उगवली आहे. दररोज महावितरणचे अधिकारी, कर्मचारी येऊन दुरुस्ती करतात.

अखंडित वीज पुरवठा मिळत नाही, असे दत्त आंगणचे अध्यक्ष अनिल बांदल यांनी सांगितले.येत्या आठ दिवसांत या समस्येवर तोडगा काढावा, अन्यथा रस्त्यावर उतरून महावितरणविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा हरिदास चरवड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

वडगाव परिसरातगॅसवाहिनीसाठी खोदाई झाल्याने त्या शेजारील वीजवाहिनी अनेक ठिकाणी खराब झाली. दबाडी परिसरात आणखी दोन- तीन ट्रानसफार्मर बसवण्यासाठी जागा हवी पाहिजे. काही ठिकाणी पालिकेची जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळेदेखील वीजवाहिनी खराब झाली आहे. तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत केला जात आहे.

-कल्याण गिरी, उपअभियंता, महावितरण, धायरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT