Prakash_Ambedkar_Modi 
पुणे

'पंतप्रधान मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात'; आंबेडकरांच्या टीकेचा रोख कुणाकडे?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मी दिल्लीत का जात नाही म्हणून मला विचारलं गेलं, पण माझा लढा हा राज्यात आहे. राज्यात लढा पूर्ण होत नाही, तोपर्यंत दिल्लीत जाणार नाही. पंतप्रधान मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यात रविवारी (ता.७) गरीब मराठा समाज संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आंबेडकरांनी राज्यातील तसेच केंद्रातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं होतं. 

शेतकऱ्यांचं आंदोलन वस्तुस्थितीला धरूनच
राजधानी दिल्लीत सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन हे वस्तुस्थितीला धरून आहे. कृषी हा राज्याचा विषय आहे. काँट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा करण्यापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आम्ही रोखू शकलो नाही. मी दिल्लीत का जात नाही म्हणून मला विचारलं गेलं, पण माझा लढा हा राज्यात आहे. राज्यात लढा पूर्ण होत नाही, तोपर्यंत दिल्लीत जाणार नाही. पंतप्रधान मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली. त्यांचा रोख शरद पवारांकडे होता की आणखी कुणाकडे याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. 

आंबेडकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने कायदा रद्द केला तर देशातील कायदा आपोआप रद्द होतो. कायदा रद्द करणं हे पूर्णपणे राज्यावर अवलंबून आहे. पण तीन पायाच्या सरकारला हा कायदा रद्द करण्यास काय अडचण येत आहे, हे कळत नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवायचा असतील, तर काँट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा रद्द करण्याची गरज आहे.

काँट्रॅक्ट फार्मिंगमुळे पुन्हा सावकारी सुरू होतील आणि जमिनी जातील. जर असं झालं, तर शेतकऱ्यांच्या हातात काहीही शिल्लक राहणार नाही. बाजार समिती ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची संकल्पना होती. कसेल त्याची जमीन असा कायदा केला होता. पण उत्पादनाची लूट होण्याबाबत काहीही केलं नाही. आम्ही दोन मागण्या केल्या, पण त्याकडे लक्ष दिलं नाही, असा आरोपही आंबेडकर यांनी सरकारवर केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा! विनोद तावडे, वसुंधरा राजे अन् स्मृती इराणी यांच्याकडे मोठी जबाबदारी, वाचा यादी...

IND vs SL 1st Test: श्रीलंकेचा पलटवार, भारताचे गोलंदाज झाले गार! २०१५ मध्ये जे घडलं होतं, तसंच होण्याची भीती; गौतम गंभीरला आठवलं तेव्हा नेमकं काय झालेलं...

'धर्मवीर' पाहिल्यावर रस्त्यावर प्रसाद ओकची वाट पाहत थांबलेले उद्धव ठाकरे; अभिनेत्याने सांगितला तो प्रसंग; म्हणाला- त्यांनी...

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट

हे पाहायला तू हवा होतास... इमरान हाश्मीचा 'आवारापन २' पाहून प्रेक्षकांना आठवला 'हा' मराठी अभिनेता; म्हणतात-

SCROLL FOR NEXT