LN4 Artificial Hand
LN4 Artificial Hand sakal
पुणे

कान्हूर येथील प्रथमेशच्या आयुष्याला मिळाली एल एन ४ कृत्रिम हाताने कलाटणी

कृष्णकांत कोबल

हडपसर : सात महिन्यापूर्वी प्रथमेशचा उजवा हात कडबाकुट्टी यंत्रात जाऊन तुटला होता. या अपघाताने त्याच्यासह त्याचे पुरते कुटुंब हबकून गेले होते. मात्र, येथील महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सानेगुरुजी आरोग्य केंद्र व रोटरी क्लब ऑफ पूना डाऊनटाऊनच्या माध्यमातून नुकताच त्याला "एल एन ४ कृत्रिम हात' बसविण्यात आला आहे. आता तो लिहिण्या खाण्यासह दैनंदिन कामे करू लागला आहे. त्यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब आनंदीत झाले आहे.(Saneguruji Health Center of Maharashtra Health Board and Rotary Club of Poona Downtown)

जून महिन्यात शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील सहावीत शिकणाऱ्या प्रथमेश मिडगुले हा विद्यार्थी आईला मदत म्हणून कडबाकुट्टी यंत्रावर आपल्या जनावरांसाठी चारा कापत होता. त्यावेळी चालू यंत्राच्या कात्रीत त्याचा उजवा हात जाऊन त्याला अपघात झाला होता. हाताचा कोपऱ्याखालील भाग संपूर्ण तुटून गेला होता. वैद्यकीय उपचाराने जखम बरी झाली. मात्र, थोट्या हाताने तो काहिही करू शकत नव्हता. या विचाराने त्याचे आयुष्य व कुटुंबातील सर्व सदस्य हतबल झाले होते. सरावाचाच हात गेल्याने लिहिणे, खाणे व इतर काम बंद झाले होते. त्यासाठी त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहवे लागत होते.

तो शिकत असलेल्या कान्हूर मेसाई येथील विद्याधाम विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल शिंदे यांना हडपसरच्या महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी आरोग्य केंद्रातील "एल एन ४ कृत्रिम हात' उपक्रमाबाबत माहिती मिळाली होती. प्रथमेशच्या आईला याबाबत माहिती देऊन त्यांनी आरोग्य केंद्राशी संपर्क साधून नुकताच प्रथमेशला एल एन ४ कृत्रिम हात बसविण्यात आला आहे. या हाताने तो आता लिहिणे, खाणे व इतर कामेही करू लागला आहे. त्यामुळे तो, त्याचे संपूर्ण कुटुंब व मित्र परिवार आनंदीत झाला आहे.(Information was received about the "LN4 Artificial Hand" initiative of Sane Guruji Health Center of Maharashtra Health Board)

महाराष्ट्र आरोग्य मंडळ व रोटरी क्लब ऑफ पूना डाऊनटाऊन यांच्या विद्यमाने सानेगुरुजी आरोग्य केंद्रांमध्ये एल एन ४ कृत्रिम हाताचे कायमस्वरूपी केंद्र सुरू आहे. प्रत्येक शनिवारी दुपारी दोन वाजता हात बसवण्यात येतात. हा कृत्रिम हात अमेरिकेतून एल एन मिडोज या संस्थेतून येतो. हा हात अत्याधुनिक, सोपा, सुटसुटीत, वापरण्यास सोपा आहे. राज्यातील विविध भागातील कोपरापासून पुढे हात गमावलेल्या व्यक्तींना त्याचा चांगला फायदा झाला असल्याचे महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल गुजर यांनी सांगितले.प्रथमेशला अमोल झगडे यांनी हात बसविला. हसनमीया शेख यांनी हात वापरण्याचे प्रशिक्षण दिले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पूना डाऊनटाऊनचे प्रदीप मुनोत, जितू मेहता, सोमनाथ राक्षे, निलेश खरडे, सोमनाथ पिंगळे, सुनील जिते उपस्थित होते.

"मला पूर्वीसारखेच लिहिणे, जेवणे, इतर वस्तू पकडणे अशी कामे नवीन बसविलेल्या एल एन ४ या कृत्रिम हाताने करता येऊ लागली आहेत. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. सरांनी व आईने त्यासाठी योग्य प्रयत्न केले.'

-प्रथमेश मिडगुले

"सात महिन्यांपूर्वी प्रथमेशचा अपघात झाल्यावर आम्ही खचून गेलो होतो. त्याच्या सरांनी सानेगुरुजी आरोग्य केंद्रातील या उपक्रमाची माहिती सांगितली. त्यावेळी हे शक्य आहे की नाही, त्याबाबत शंका होती. मात्र, कृत्रिम हात बसविल्यानंतर प्रथमेशला स्वतःच्या उजव्या हाताने लिहिताना, खाताना पाहताना एक आई म्हणून जो आनंद झाला तो वर्णन करू शकत नाही.'

-सविता मिडगुले, प्रथमेशची आई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT