Vittal 
पुणे

Video : दिवेघाटातला विठ्ठल आला, भाविकांच्या भेटीला

प्रवीण डोके

मार्केट यार्ड - जय जय राम कृष्ण हरी, पाऊले चालती पंढरीची वाट, पंढरीची वारी माऊली बोलतो, अशा भक्तिभावात तल्लीन होऊन एकसुरात वारकरी मंडळी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला प्रस्थान करत असे. दरवर्षी वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी जात असे, पण यावर्षी सासवडच्या दिवेघाटात विठ्ठल स्वतः वारकऱ्यांच्या भेटीला आला आहे. घाट माथ्यावरील विठ्ठलाची साठ फुटी भव्य मूर्ती वारकरी आणि पुणेकरांसाठी भक्तिमय आकर्षण ठरत आहे. अनेक वारकरी सध्या या विठ्ठलाला भेटण्यासाठी घाटात जात आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावर्षी ना पालखीचे आगमन, ना भक्तीचा सोहळा ना विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी चालत जाणारे भक्तिमय चेहरे दिसले. विठ्ठलाची ही दिवेघाटातील मूर्ती पाहून वाटते, वर्षाने येणाऱ्या या सोहळ्याची विठ्ठलानेही वाट पाहिली असेल.

परंतु यावेळी कोरोनाच्या संकटामुळे सर्वदूर शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणेकर, वारकरी आणि विठ्ठलही निराश झाला आहे. ही दिवे घाटातील विठ्ठलाची साठ फुटी भव्य मूर्ती वारकरी आणि पुणेकरांसाठी भक्तिमय आकर्षण आहे. विजय कोल्हापुरे आणि बाबासाहेब कोल्हापुरे या वारकरी बंधूंच्या राजराजेश्र्वर सेवाभावी संस्थेतर्फे ही मूर्ती उभारण्यात आली. मूर्तिकार सागर भावसार यांनी ही मूर्ती साकारली असून यामध्ये सिमेंटसह काही धातुंचाही वापर करण्यात आला आहे. मूर्तीचे मुख्य आकर्षण असलेल्या टीळयाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. घाटाच्या माथ्यावर असल्यामुळे अनेक प्रवाशांचा प्रवास सुखद करणारी ही मूर्ती यावेळी तिच्या हक्काच्या वारकऱ्यांची आतुरतेने वाट पाहत आहे. 

भक्ती रसाच्या कुंचल्याने काळया रंगात साकारलेली विठ्ठलाची मूर्ती भक्तिरूपाने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सदैव पाठीशी असल्याची भावना समाज माध्यमातून वारकरी भाविकांनी व्यक्त करत आहेत.

कोरोनामुळे सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वारकऱ्यांनी सरकारच्या आदेशाचे पालन करत यावेळी घरूनच आभाळातल्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याचे ठरवले आहे. दरवर्षी विठ्ठलाची परंपरागत चालत आलेली पालखी दोन दिवस पुण्यात थांबून तिसऱ्या दिवशी पहाटेच पुणेकरांचा निरोप घेत असे. यामध्ये पुणे ते सासवड हा टप्पा आळंदी ते पंढरपूर पालखी रस्त्यावर सर्वाधिक अंतराचा टप्पा असायचा. या रस्त्यांवर विठ्ठलभक्त रस्त्याने गर्दी करून पालखीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करायचे. या धकाधकीच्या आयुष्यात पांडुरंग, माऊलीचे दर्शन व्हावे याकरिता रस्ताभर लोकांच्या भक्तीचा सोहळा रंगत असे. हे नयनरम्य, आल्हाददायक दृश्य वर्षभराचा थकवा घालवत असे. 

मनाचिये वारी : पांडुरंगा, कशासाठी आमच्या पदरी झुरणीची वारी

मूर्तीची वैशिष्टय 
- साठ फुट भव्य मूर्ती
- मूर्तीमध्ये सिमेंटसह धातुंचाही वापर
- कपाळावरील टीळयाला सोन्याचा मुलामा
- मूर्ती उभा करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी
-  राजराजेश्र्वर सेवाभावी संस्थेतर्फे ही मूर्ती उभारण्यात आली आहे
-  काळया रंगात साकारलेली विठ्ठलाची मूर्ती प्रचंड आकर्षक वाटते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Accident : इलेक्ट्रिक 'शिवाई' बसची अनेक गाड्यांना धडक, घटनास्थळावरचा VIDEO आला समोर

Rain Update: भीषण घटना! क्रिकेटच्या मैदानावर वीज कोसळली; एका खेळाडूचा मृत्यू, अनेक जखमी, मान्सूनचा कहर

देऊळ बंद २ ने राजा शिवाजी सिनेमाचाही रेकॉर्ड मोडला, आतापर्यंत कमावले तब्बल इतके कोटी

Thane News: अंबरनाथ शिवमंदिर परिसरातील आरक्षणाविरोधात विहिंप-बजरंग दल आक्रमक, बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : भारत-इस्रायल संरक्षण सहकार्याला नवी गती; राजनाथ सिंह-आमीर बाराम यांची भेट

SCROLL FOR NEXT