vina.jpg 
पुणे

खळद येथे विणा सप्ताहातून कोरोना मुक्तीची प्रार्थना

सकाळवृत्तसेवा

खळद : खळद (ता. पुरंदर) येथे राम मंदिरात सालाबादप्रमाणे विणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुणांनी हरिनामाचा गजर करीत कोरोना मुक्तीसाठी प्रार्थणा केली.

यावेळी सर्वांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेले सर्व नियम यामध्ये "हाताला सॅनिटायझर लावणे, तोंडाला मास्क लावणे व सामाजिक अंतर राखणे" याचे पालन करीत हा सप्ताह पार पाडला.

येथे दरवर्षी श्रीकृष्ण गोपाळ कालाष्टमी निमित्ताने विणा सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावेळी गावातील सर्व नागरिक सात दिवस मंदिरामध्ये विणा गळ्यामध्ये घेऊन हरी नामाचा गजर करतात. यात साखळी पद्धतीने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे विणा सोपविला जातो, मात्र विणा हा जमिनीवरती ठेवला जात नाही. ही या सप्ताहाची परंपरा असून, श्रीकृष्ण जन्माच्या वेळी विणा विधिवत पूजा करून उतरवला जातो.

यामध्ये कादबाने, घोडकेमळा, खळदकर, चव्हाण, रासकर, जमदार, मुकादम, सुभेदार, केसनाना वाडा, पटकर, मास्तर वाडा, इभाड, फुले, बुरकुल, आकार्शे यांनी सहभाग घेतला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा सप्ताह आगळावेगळा सप्ताह असून, या माध्यमातून गावातील सर्व नागरिक एकत्र येतात. आपल्याला मिळालेली सेवा करतात व यातूनच हरिनामाचा गजर होत एकात्मिकतेची भावना नवीन पिढीत रुजविण्याची महत्त्वाचे काम होत असल्याचे ग्रामपुजारी नंदकिशोर गुरव यांनी सांगितले.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT