Faral
Faral 
पुणे

पुण्यात फराळाच्या ‘कॉम्बो पॅक’ला पसंती

सकाळवृत्तसेवा

पुणे - गौरी-गणपतीनिमित्त घरोघरी काहीसा गोड, तिखट असा फराळ पोचविणे हा व्यवसाय असला, तरी त्याद्वारे आपल्या हाताची चव दुसऱ्यांना चाखविण्याचा आनंद अधिक सुखावह असतो. एवढंच नव्हे, तर या व्यवसायातून आपले कुटुंबही एकत्र जोडून राहते, असा सुखद अभिप्राय सिंहगड रस्ता परिसरात राहणाऱ्या प्रिया वाशीकर यांनी नोंदविला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणराया पाठोपाठ येणाऱ्या महालक्ष्मीच्या स्वागतासाठी घराघरांत महिलांची लगबग आता सुरू झाली आहे. गौरी-गणपतीनिमित्त प्रत्येकाच्याच घरी गोडाधोडाचा नैवेद्य असतो, तर महालक्ष्मींसमोर फराळाची आरास रचली जाते. यानिमित्त घरोघरी फराळाची धामधूम सुरू असते. परंतु हल्ली गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी फराळ घरी बनविण्याऐवजी तो विकत आणला जातो. तसेच काही घरांमध्ये नोकरीमुळे पुरेसा वेळ उपलब्ध नसल्याने महिला महालक्ष्मींसमोर मांडण्यात येणारा फराळ रेडिमेड घेण्यास पसंती देतात.

घरपोच फराळ मिळावा, यासाठी गणेशोत्सवाच्या आधीपासूनच ऑर्डर बुक करण्यात आल्या आहेत. घराजवळच्या बचत गटांना किंवा खाऊ विक्रेत्यांना ऑर्डर देण्याचा पर्याय महिला अधिककरून निवडतात. परंतु यंदा कोरोनामुळे रेडिमेड फराळ विक्रीवर निश्‍चितच परिणाम झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा फराळ विक्रीत तब्बल २० ते २५ टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तर यावर्षी महिला बॅंडेड पॅक फूडला अधिक पसंती देत आहेत. मात्र, तरीही घरपोच फराळ पोचविणाऱ्या विक्रेत्यांनी फराळ प्रत्यक्ष बनविताना सुरक्षितता आणि पॅकिंगची खात्री विक्रेत्यांना दिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

घरपोच फराळाच्या सर्वसाधारण किमती
फराळ कॉम्बो पॅक - ७५० ते १२०० रुपये (एकूण एक ते दोन किलो)
लाडू - (बेसन, रवा, मूग) ४५० ते ५०० रुपये (एक किलो)
चकली - ३५० ते ४५० रुपये (एक किलो)
करंज्या - ४०० ते ५०० रुपये (एक किलो)
चिवडा - ३०० ते ४५० रुपये (एक किलो)

घर सांभाळून हा व्यवसाय करणे शक्‍य होते. बारा महिने हा व्यवसाय सुरू असतो. मात्र, गौरी-गणपती, दिवाळी या सणांच्या काळात ऑर्डर मोठ्या प्रमाणात असतात. दर महिन्याला किमान २० ते २५ हजार रुपयांचा व्यवसाय निश्‍चित होतो. 
- प्रिया वाशीकर,  फराळ व्यावसायिक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT