ganpati bappa.jpg 
पुणे

पुण्यातील बाजारपेठांमध्ये बाप्पांच्या आगमनाची लगबग

सकाळवृत्तसेवा

बालेवाडी (पुणे) : आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने घराघरातून बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे आरास करण्यासाठी लागणारी झुंबर, प्लास्टिकच्या फुलांच्या माळा आदी सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. तसेच घरात आणली जाणारी बाप्पाची मूर्ती सगळ्यांना आवडणारी असावी म्हणून ती आधीच  आरक्षित करून ठेवण्याची गडबड ही सुरू झाली आहे. तर काही नागरिकांनी मात्र ऑनलाईन मूर्तीबुक करण्यास पसंती दिली आहे.

यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी शाडू मातीच्या आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या पर्यावरण पूरक मूर्तींना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र बाजारात आहे. सर्वांच्या आवडत्या          बाप्पांच्या आगमनाला काहीच दिवस राहिले आहेत. कोरोनाचे संकट जरी खूप मोठे असले तरी घराघरातून साधेपणाने का होईना पण गणपती बाप्पा येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आगमनाचे वेध लागले आहेत. लहान मुले तर बाप्पांच्या आगमनासाठी आतूर झाली आहेत.

ज्यांच्या घरात गौरी-गणपती दोन्ही असतात अशा घरातून साफसफाई त्याचबरोबर फराळ बनवण्यासाठी लागणारे किराणा मालाचे साहित्य आणणे, फराळासाठी पूर्वतयारी करणे ही कामे सुरू झाली आहेत. तसेच घरांमध्ये आरास कोणती करायची याविषयी चर्चाही सुरू झाल्या आहेत. तर सोशल मीडियावरही यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे तेही शोधण्यामध्ये मुले व्यस्त झाली आहेत.                

बाजारामध्ये बाप्पांच्या आरतीसाठी लागणारे पुजेचे सामान, प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, लाईटच्या माळा, मेटलच्या समया असे सामान लावून दुकाने सजली आहेत. यावर्षी कोरोना चा प्रादुर्भाव असल्यामुळे काही नागरिकांनी सर्व काळजी घेत  दुकानात सहकुटुंब जाऊन  मूर्तीची निवड केली. तर काही नागरिकांनी दुकानात न जाता ऑनलाइन मूर्ती खरेदी करत, घरपोच मूर्ती मिळेल असा पर्याय निवडला आहे. गणपतींच्या मूर्ती कशा असाव्यात याबद्दल बरीच जनजागृती झाल्यामुळे नागरिक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी शाडूच्या किंवा कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींना जास्त प्रतिसाद देत असल्याचे मत मूर्ति विक्रीकर तुकाराम तीपाले यांनी व्यक्त केले. कोरोनामुळे गेल्या वर्षीपेक्षा यावेळी मूर्तींच्या किमती या पाच ते दहा टक्‍क्‍यांनी वाढल्या असून शाडूच्या मूर्ती या पीओपीच्या मूर्ती पेक्षा महाग जरी असल्या तरी नागरिक शाडूच्या मूर्ती घेण्यास पसंती देत आहेत. साधारणपणे दोन फुटांपर्यंतच्या शाडूच्या मूर्तींना मागणी आहे असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

भारतीय संघात बदल; ईशान किशनची माघार, त्याच्याजागी संघात नवा खेळाडू

SCROLL FOR NEXT