admission Sakal Media
पुणे

दहावी-बारावीच्या तांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तयारी सुरू

तंत्रशिक्षण संचालनालयाने इच्छुक विद्यार्थ्यांकडून मागविली माहिती

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप अंतर्गत मूल्यमापन आणि निकाल कसा लावला जाईल, तसेच बारावीच्या परीक्षेबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. असे असतानाही राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने मात्र दहावी, बारावी नंतरच्या तांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. एकीकडे गुगल फॉर्म सारखे पर्याय वापरून अकरावीच्या प्रवेशाची चाचपणी किंवा तयारी करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे पत्र काढून कानउघडणी केली जाते. अद्याप प्रवेशाबाबत कोणताही निर्णय न झाल्याने प्रवेशाची तयारी न करण्याची सूचना केली जाते. तर दुसरीकडे दहावी-बारावीच्या परीक्षा, निकाल याबाबत ठोस निर्णय झालेला नसताना तंत्रशिक्षण संचालनालय तांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या तयारीला लागले आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय), व्यवसाय अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) नंतरच्या तांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना माहिती भरण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यासाठी संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘विद्यार्थ्यांना कृपया आपली माहिती भरावी जेणेकरून आपणास प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देता येईल. तसेच वेळोवेळी सूचना पाठविता येतील. संचालनालयाच्या जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांकडून प्रवेशाबाबत समुपदेशन करण्यात येईल. जेणेकरून आपण प्रवेशापासून वंचित राहणार नाही.’, अशी सूचना त्यावर दिली आहे. यात विद्यार्थ्यांचे नाव, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल, जिल्हा, इच्छुक पदविका अभ्यासक्रम आणि अभिप्राय मागविण्यात आला आहे.

यापूर्वी तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना केलेली आहे.

तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत दहावी-बारावीनंतर राबविण्यात येणारे अभ्यासक्रम :

- प्रथम वर्ष इयत्ता दहावीनंतरचा पदविका अभ्यासक्रम (तंत्रनिकेतन)

- इयत्ता बारावी नंतर डी. फार्मसी

- इयत्ता बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी

- इयत्ता बारावीनंतर सरफेस कोटिंग तंत्रज्ञान

- थेट द्वितीय वर्ष दहावी नंतरचा पदविका (तंत्रनिकेतन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT