Savitribai-Phule-Pune-University 
पुणे

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू असताना कर्मचाऱ्यांनी काम बंद पाडले

ब्रिजमोहन पाटील

पुणे - विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी, अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवार (ता. 1) पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू असताना आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांनी आजच (बुधवारी) काम बंद पाडून, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बाहेर पडण्यास भाग पाडले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्रातील 13 अकृषी विद्यापीठातील कर्मचारी, अधिकारी यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, आश्वासित प्रगती योजना पुन्हा सुरू करावी, विद्यापीठ, महाविद्यालयातील रिक्त पदे भरावीत, पाच दिवसांचा आठवडा लागू करा यासह 10 मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी 24 सप्टेंबर पासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयीन शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन बैठक घेतली, पण त्यात तोडगा निघाला नाही. दरम्यान या बैठकीचे इतिवृत्त काढले असून त्यातील आश्‍वासनांवर कर्मचारी समाधानी नाहीत, त्यामुळे बुधवारी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले.

गुरुवार पासून बेमुदत आंदोलन सुरू होणार असताना त्याच्या एक दिवस आधीच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी परीक्षा विभागात जाऊन सर्वांना बाहेर पडण्याचे आवाहन केले. दुपारनंतर काही अधिकारी पुन्हा कामासाठी आत गेले असता, त्यांना पुन्हा काम न करता बाहेर पडण्यास सांगण्यात आल्याने आज दिवसभरात काहीच काम होऊ शकले नाही.

'गेल्या आठवड्यात शिक्षकेतर कर्मचारी, अधिकाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले, पण आता उद्यापासून विद्यापीठातील एकाही विभागाचे कुलूप देखील उघडले जाणार नाही. आमचे काम आंदोलन किती दिवस चालवायचे हे सरकारच्या भूमिकेवर आवबंलून आहे.''
- डॉ. सुनील धिवार म्हणाले, उपाध्यक्ष, पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समिती

संजीव धुरंधर यांचा सन्मान; अमेरिकन फिजिकल सोसायटीचे फेलो म्हणून निवड

कुलगुरूंनी घेतला परीक्षेचा आढावा
अंतिम वर्षाच्या परीक्षेचे काम लवकर संपवून वेळापत्रक जाहीर करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर कुलगुरू डॉ. नितीन करकळमकर यांनी परीक्षा विभागाला भेट दिली. प्र- कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार हे देखील यावेळी उपस्थित होते. परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी तयारीची माहिती दिली.

अजित दादा काढणार तोडगा ?
उदय सामंत यांनी बैठक घेऊन कोणताही तोडगा निघाला नाही, त्यानंतर आता बेमुदत आंदोलन सुरू होणार आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक होणार आहे. बहुतांशी प्रश्‍न वित्त विभागाशी संबंधित असल्याने अजित पवार यात थेट निर्णयही घेऊ शकतील, त्यामुळे आंदोलनावर तोडगा निघणार का याकडे लक्ष लागले आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT