पुणे

Ajit Pawar: दिल्लीत शाहांच्या भेटीनंतर बारामतीत अजित पवार, सुप्रिया सुळे एका मंचावर!

मिलिंद संगई, बारामती

बारामती- डेंगीच्या आजारातून बरे झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रथमच बारामतीत शारदोत्सव या कार्यक्रमात उपस्थिती लावत सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित होते. दरवर्षी दिवाळीमध्ये पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने शारदोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

यंदा बेला शेंडे यांच्या लाईव्ह कॉन्सर्टचा कार्यक्रम गदिमा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती.अजित पवार यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर कालच अजित पवार यांनी दिल्लीचा दौरा केला होता.

आज बारामतीत त्यांनी नेहमीच्या प्रथेप्रमाणे पवार कुटुंबीयात मिसळत शारदोत्सवाच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमादरम्यान बेला शेंडे व सहकारी वादकांचा अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी एकत्र व्यासपीठावर येत सत्कार केला.

बारामतीकरांनी देखील या प्रसंगी टाळ्यांच्या कडकडात त्यांना दाद दिली. अजित पवार यांनी या शारदोत्सवात पूर्णवेळ कार्यक्रमाला उपस्थिती लावत कार्यक्रमाचा आनंद घेतला. सुनेत्रा पवार याही या प्रसंगी उपस्थित होत्या. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : आम्ही परराष्ट्र मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहोत आणि महाराष्ट्र सरकारही यासंदर्भात चर्चा करतंय - सुळे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT