rain.jpg 
पुणे

पुण्यात पावसाची धुवाधार बॅटींग

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरात आज सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने उघडीप घेतली होती. त्यामुळे शहरात उकाडाही जाणवू लागला होता. दरम्यान शनिवारी पुन्हा पावसाने हजेरी लावत सोसाट्याचे वारे वाहत आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह पावसाच्या जोरदार सरी पडताहेत.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी (ता. 6) सुद्धा शहरात मेघगर्जनांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गेल्या दोन दिवसांनपासून पुण्यातील कमात तापमानात वाढ होत असतानाची नोंद झाली. त्यामुळे उकाडाही पुणेकरांना अनुभवावा लागला. तर शनिवारी सकाळपासूनच हवामान कोरडे होते व उन्हाचे चटके जाणवत होते. मात्र सायंकाळी
अचानक पावसाला सुरूवात झाली आणि शहरात पावसाच्या जोरदार सरी पडल्या. त्यामुळे पावसाचा अंदाज न घेता बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.

मात्र दोन दिवसांपासूनच्या उकाड्यातून काही काळ नागरिकांना मुक्ती मिळाली आहे. दरम्यान रविवारी सुद्धा शहरात मध्यम सरींचा अंदाज व घाट विभागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत (ता. 11) शहरात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा ईशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.

वारजे कर्वेनगर भागात मुसळधार पाऊस...

सातारा रस्ता, स्वारगेट, महर्षीनगर सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी परिसरात पंधरा मिनिटे जोरदार पाऊस पडला. सध्या पाऊस थांबला असून काही वेळासाठी पडलेल्या पावसामुळे सदर परिसर जलमय झाला आहे.

औंध, औंध रस्ता, बाणेर रस्ता, पाषाण, पंचवटी, महाळुंगे, सुतारवाडी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.

सिंहगड रस्ता परिसरात गेल्या एका तासापासून हा पाऊस सुरू आहे.

वडगाव, धायरी, नऱ्हे परिसरात जोरदार पाऊस असून वाहतूक कोंडी झाली.

कोथरूड, पौडरस्ता भागात जोरदार पाऊस. सागर काॅलनी नाला, सुतारदरा नाल्यांची पाणी पातळी वाढली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT