मंचर : पोलिस असल्याचे सांगून मोटारसायकलची झडती घेऊन ५३ वर्षाच्या शेतकऱ्याच्या गळ्यातील एक लाख 71 हजार रुपयांची सोन्याची चैन चोरट्याने लांबविली. मंचर (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी भरदिवसा साडेअकराच्या सुमारास सदर घटना घडली.
मंचर-पिंपळगाव रस्त्यावरील तृप्ती हॉस्पिटलजवळ बाळासाहेब गोपाळा अरगडे व दत्तात्रेय बांगर (रा. खडकी-पिंपळगाव ता. आंबेगाव) हे दोघेजण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मित्राला भेटून पिंपळगावकडे मोटार सायकलवरून निघाले होते. त्यावेळी हा चोरटा तेथे आला. शिंदे यांचे कपड्याचे दुकान कोठे आहे”? असे त्यांने विचारल्यामुळे अरगडे यांनी मोटरसायकल थांबवली. “मी पोलिस आहे. गांजा विकणारे दोन आरोपी पकडले आहेत. दोन जण फरारी आहेत. फरारी तुमच्या सारखेच दिसत आहेत. तपासणी सुरू आहे. तुमच्या गाडीची कागदपत्रे व लायसन्स दाखवा.
त्यामुळे गोंधळून गेलेले अरगडे म्हणाले, ''मित्राला दवाखान्यात भेटण्यासाठी घाईगडबडीत आलो. लायसन्स व कागदपत्रे घरीच विसरले आहेत.'' चोरटा म्हणाला, ''तुमच्याकडे कागदपत्रे नाहीत, याचा अर्थ तुमची गाडी चोरीची आहे असे वाटते. तुम्ही मोटरसायकल पोलिस ठाण्यात घ्या असे म्हणत. त्याने अरगडे , बांगर व मोटरसायकलची झडती घेतली. अरगडे यांच्या गळ्यातील ३१.९९० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन काढून अरगडे यांच्या रुमालात ठेवली. ''तुमच्या घरी चला, गाडीची कागदपत्रे तपासायची आहेत. असे म्हणत त्याने मंचर शहराकडे धूम ठोकली.
त्यावेळी रुमालात चैन नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अरगडे व बांगर यांनी चोरट्याचा पाठलाग केला. पण त्याचा शोध लागला नाही. मंचर पोलिस ठाण्यात अरगडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अनोळखी व्यक्तीशी बोलू नका. आपला परिचय व वस्तू त्यांना देऊ नका. ताबडतोब पोलिस ठाण्याशी व १०० क्रमांकावर फोन करून संपर्क साधावा. चोरट्याचा शोध घेण्याचे काम पोलिस करत आहेत.-अर्जुन शिंदे ,पोलिस उपनिरीक्षक मंचर
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.