पुणे

भेंडी, टोमॅटो, मटार, पावट्याच्या भावात वाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे - बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्या इतकीच झाली आहे. मात्र मागणी वाढल्याने भेंडी, टोमॅटो, मटार आणि पावट्याच्या भावात वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

रविवारी मार्केटयार्डात ८० ते ९० गाड्यांची आवक झाली़. परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून १० टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ५ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूतून ५ टेम्पो शेवगा, कर्नाटक, गुजरात आणि आंध्रप्रदेशातून १० टेम्पो हिरवी मिरची, राजस्थान आणि मध्यप्रदेशातून मटार १४ ट्रक, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून १० ट्रक लसूण, आग्रा, इंदूर आणि स्थानिक परिसरातून बटाट्याची ३० ट्रक आवक झाली.स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले १६०० गोणी, कोबी ८ टेम्पो, प्लॉवर १० टेम्पो, भेंडी ७ टेम्पो, गवार ६ टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, टोमॅटो ७ हजार पेटी, भुईमूग शेंगा ५५ पोती, तांबडा भोपळा ८ टेम्पो, हिरवी मिरची ५ टेम्पो, गवार ६ टेम्पो, कांदा ८० ट्रक आवक झाली.

कोथींबीर, मेथी, मुळा, पालकच्या भावात घट
मार्केटयार्डात रविवारी कोथींबीर, मेथी, मुळा, पालक आणि हरभरागड्डीच्या भावात घट झाली असून चाकवत, करडई, पुदीना, अंबाडी, राजगिरा, चुका आणि चवळईच्या भावात वाढ झाली आहे तर शेपूचे भाव मात्र स्थिर होते. 

रविवारी मार्केटयार्डात कोथिंबिरीच्या दीड लाख जुड्यांची, मेथीची ६० हजार जुड्यांची तर हरभऱ्याची २५ हजार गड्डींची आवक झाली. कोथींबीर, मेथी, पालक, हरभऱ्याच्या जुडीमागे एक रुपये, कांदापात आणि मुळ्याच्या भावात प्रत्येकी दोन रुपयांनी घट झाली तर चवळई, चुका आणि चाकवतच्या भावात तीन रुपये, करडई, पुदीना, अंबाडी आणि राजगिऱ्याच्या भावात जुडीमागे एक रुपयांनी वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी  दिली.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) कोथींबीर : ३००-९००, मेथी : ४००-७००, शेपू : ७००-८००, कांदापात : ५००-८००, चाकवत : ६००-८००, करडई : ४००-५००, पुदीना ़ २००-३००, अंबाडी ़ ७००-८००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ४००-६००, चुका ़ ७००-८००, चवळई : ६००-८००, पालक : ४००-५००, हरभरा गड्डी : ३००-६००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT