Abhiman Awards sakal
पुणे

ब्रिगेडियर सुनील लिमये यांना यंदाचा अभिमान पुरस्कार

ब्रिगेडियर सुनील लिमये यांनी पुण्याच्या मॉडर्न हायस्कूल मध्ये शिकून, नंतर BMCC मधुन पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, IMA डेहराडून मधून सैनिकी प्रशिक्षण घेतले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समितीच्या "पुरस्कार उपसमितीने" ब्रिगेडियर सुनील लिमये VSM, Phd, यांना यावर्षीचा 'अभिमान पुरस्कार' देशसेवा आणि सैनिकी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल जाहीर केला.

नागरिकांतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि मॉडेल कॉलनी परिसरात राहणाऱ्या विद्वान तसेच प्रतिष्ठित नागरिकांची दखल घेणे, त्यांचा यथोचित सत्कार करणे व त्यांच्याबद्दल "अभिमान" व्यक्त करणे ही या पुरस्काराची पार्श्वभूमी आहे.

Award

ब्रिगेडियर सुनील लिमये यांनी पुण्याच्या मॉडर्न हायस्कूल मध्ये शिकून, नंतर BMCC मधुन पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, IMA डेहराडून मधून सैनिकी प्रशिक्षण घेतले. त्यांची नेमणूक "शिख रेजिमेंटमध्ये" करण्यात आली. त्यानंतर त्यांनी सैन्यात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या. त्यात ते ७ वेळा जम्मू कश्मीर मध्ये तैनात होते व अतिरेकींशी प्रत्यक्ष सामना केला. त्यांनी "अर्बन टेररिझम" या विषयावर सावित्रीबाई पुणे विद्यापीठाची Phd मिळवली आहे.

सैन्याच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्थां ज्या महु, वेलिंग्टन, सिकंदराबाद, नाशिक येथे त्यांचा सक्रिय सहभाग होता व त्यांनी इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा काम केलेले आहे. सध्या ब्रिगेडियर लिमये NCC "राष्ट्रीय कॅडेट कोर" पुणे, येथे ग्रुप कमांडर म्हणून नियुक्त आहेत. ते मॉडेल कॉलनीत राहतात.

कार्यक्रमाची सुरुवात समितीचे सचिव राहुल वंजारी यांनी सर्वांचे स्वागत व ओळख करून केली. " अभिमान पुरस्कार" ब्रिगेडियर लिमये यांना समितीच्या संस्थापक ट्रस्टी आणि पुरस्कार समिती सदस्य शामला देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार समिती समन्वयक उमा शर्मा तसेच समिती सदस्य जितेंद्र मंडोरा, यांच्या हस्ते लिमये यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष विक्रमसिंह मोहिते आणि पुरस्कार समिती सदस्य बाळासाहेब दारवटकर उपस्थित होते.हा कार्यक्रम ग्रुप हेडकॉटर-राष्ट्रीय कॅडेट कोर - पुणे, सेनापती बापट रोड, येथे संपन्न झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

Horoscope Prediction : आज धनयोग + सर्वार्थ सिद्धी योग! 'या' 5 राशींना होणार धनलाभ अन् भगवान विष्णू अनेक अडचणी दूर करणार!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2025

ढिंग टांग : बिबटे : ठिपके आणि ठपके..!

Horoscope : शुक्र ग्रहात विशेष गोचर! बनतोय लक्ष्मी नारायण योग; 'या' राशीच्या लोकांच्या अपूर्ण इच्छा होणार पूर्ण, पैशाची अडचण संपणार

SCROLL FOR NEXT