Mudra-Scheme 
पुणे

मुद्रा योजनेवर महाराष्ट्राची छाप

यशपाल सोनकांबळे

पुणे - प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत महाराष्ट्रात एप्रिल २०१५ पासून ते जुलै २०१८ अखेरपर्यंत ५७ हजार ४४३ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. यात आतापर्यंत एक कोटीहून अधिक कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत कर्ज वितरित करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरले आहे. 

देशातील असंघटित लघू उद्योगांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१५ मध्ये मुद्रा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शिशू, किशोर व तरुण या तीन कर्ज प्रकारात ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. देशात १३ कोटी ३७ लाख ८५ हजार कर्ज प्रकरणांना मंजुरी दिली आहे.

यापैकी ६ लाख ३२ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून जुलैअखेर ६ लाख १० हजार कोटींचे कर्ज वितरित केले आहे. त्यापैकी महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक कर्ज प्रकरणे मंजूर झालेली आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून एक कोटी १४ लाख ४७ हजार २३७ प्रकरणे मंजूर केली आहेत. यात आतापर्यंत ५९ हजार कोटी रुपये मंजूर केले असून, त्यापैकी सर्वाधिक ५७ हजार ४४३ कोटींचे कर्ज वितरण जुलै २०१८ अखेरपर्यंत केले आहे. तरुण कर्ज प्रकारात सर्वाधिक १६ हजार ५२९ कोटी रुपयांचे कर्जही महाराष्ट्राने वितरित केले आहे.

सात महिन्यांत १४ हजार कोटींचे वितरण 
मुद्रा योजनेत महाराष्ट्रात जानेवारी ते जुलै २०१८ या सात महिन्यांच्या कालावधीत १४ हजार ५८२ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. तरुण कर्ज प्रकारात गेल्या सात महिन्यांत ४ हजार ३५३ कोटी, किशोर कर्ज गटात ५ हजार १७४ कोटी आणि शिशू कर्ज गटात गेल्या सात महिन्यांत ५ हजार ५५ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''माझा चष्मा एवढा आवडतो तर...'', धनंजय मुंडेंचं मनोज जरांगेंना डबल मिनिंगमध्ये उत्तर

PMC News : पुणे महापालिकेतील टीडीआर प्रक्रिया आता ९० दिवसांत पूर्ण; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

Chhagan Bhujbal accuses Manoj Jarange : ''मनोज जरांगेंमुळेच ओबसी अन् मराठा समाजात अंतर पडलं'' ; छगन भुजबळांचा जाहीर आरोप!

Pune Crime : आंदेकर टोळीवर आणखी एक गुन्हा; सदनिकांची विक्री करून फसवणूक

Thane Crime: दिवाळीआधीच भाजप नेत्यावर कारवाईचा फटाका फुटला! बेकायदेशीर फटाके ठेवले अन्...; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT