The Prime Minister sent greetings to the indapur's bride and groom  
पुणे

PM मोदींचा जनसंपर्क दांडगाच! इंदापुराच्या नवविवाहित जोडप्याला दिले आशीर्वाद!

सकाळवृत्तसेवा

इंदापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणी असून देखील देशाचा कुटुंबप्रमुख म्हणून आपली जबाबदारी ओळखून त्यांनी सराफवाडी (ता. इंदापूर) येथील शेतकरी कुटुंबातील नानासाहेब धनवडे पाटील यांनी पाठविलेल्या लग्नपत्रिकेतील वधूवरांना आवर्जून शुभेच्छापत्र पाठवले. त्यामुळे वधूवर व त्यांचे कुटुंबीय भारावून गेले.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे सराफवाडी (ता. इंदापूर) येथील कार्यकर्ते धनवडे पाटील परिवाराने आपल्या मुलाच्या विवाहासाठी येण्याचे आग्रही निमंत्रण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लग्नपत्रिका पाठवून दिले होते. त्याची दखल घेवून पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा संदेश पाठवून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सुखी आणि समृद्ध जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्याने धनवडे परिवारातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला. त्यातच नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी देखील या कुटुंबास शुभेच्छा दिल्या.

असा आहे पंतप्रधानांचा संदेश..
या संदेशात म्हटले आहे की, ''दीपक आणि वैभवी यांच्या विवाहाचे निमंत्रण मिळाल्याने मला आनंद झाला. तुमच्या कुटुंबाच्या आनंदाच्या क्षणी मला बोलवले त्याबद्दल धन्यवाद. हा विवाह तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी तसेच विश्वास आणि मैत्रीचा धागा दोघांना सदैव बांधून ठेवेल. तुमच्या नात्यामध्ये स्नेह राहील.''

पुणे-सोलापूर हाय-वेवर धावत्या ट्रॅव्हल्स घेतला पेट; जिवीतहानी नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI व्यवहारांवर MDR चार्ज लावण्याच्या निर्णयानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी! कारण काय?

गोकुळच्या 25 जागांसाठी रणसंग्राम! महायुतीत धुसफूस, मुश्रीफांचा भाजपला इशारा?

गेल्यावेळी मुंबईत धिंगाणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

SCROLL FOR NEXT