Prithviraj Jachak will return in NCP
Prithviraj Jachak will return in NCP 
पुणे

पृथ्वीराज जाचकांची घरवापसी होणार; राष्ट्रवादीला होणार फायदा

मिलिंद संगई

बारामती : पंचक्रोशीतील महत्वाची संस्था असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे राजकारण आगामी काळात वेगळ्या वळणावर जाणार आहे. विश्वसनीय सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार कारखान्याचे माजी अध्यक्ष व राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याच्या हिताचा विचार करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यासंदर्भात अधिकृत दुजारो मिळालेला नसला तरी अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक व किरण गुजर या चौघांची नुकतीच एक गोपनीय बैठक पार पडली. या बैठकीत जाचक यांनी अजित पवार यांच्या समवेत छत्रपती साखर कारखान्यात कार्यरत व्हावे, आगामी निवडणूकीमध्ये त्यांना सन्मान्य जागा देण्याचा शब्द पवार यांनी दिल्याचे समजते. 
---------------
ब्रिटनचे पंतप्रधान म्हणतायेत; आता घराबाहेर पडा
---------------
काँग्रेसला बसणार मोठा धक्का? २५ आमदार दिल्लीत 
---------------
छत्रपती कारखान्याच्या सभासदांच्या हिताचा विचार करत आगामी काळात एकत्रित काम करावे असा विचार करत पृथ्वारीज जाचक व अजित पवार यांनीही समन्वयाची भूमिका घेतली आहे. त्या मुळे लॉकडाऊननंतर होणा-या निवडणूकीत चित्र काहीसे वेगळे दिसेल अशी चर्चा आहे. सद्यस्थितीत पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याचे व्यापक हित विचारात घेता कारखान्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, निवडणूकीदरम्यान एकत्र बसून जाचक यांचा योग्य सन्मान ठेवून त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले. 

गेल्या अनेक दिवसांपासून ही प्रक्रीया सुरु होती, असेही समजते. या बाबत जाचक यांचा सहकारी साखर कारखानदारीतील अनुभव छत्रपती कारखान्यासाठी आवश्यक असल्याचे अनेक सभासदांचेही मत होते व अजित पवार यांनीही कारखान्याचे हित विचारात घेतच जाचक यांच्याशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे. या संदर्भात दत्तात्रय भरणे यांनाही विश्वासात घेण्यात आले असून किरण गुजर यांनी या प्रक्रीयेत समन्वयकाची भूमिका पार पाडल्याचे कळते. 

राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता...
पृथ्वीराज जाचक यांचा सहकारी साखर कारखानदारीतील दांडगा अनुभव आहे. राज्य सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदासह अनेक महत्वाच्या जबाबदा-या त्यांनी सांभाळलेल्या आहेत. छत्रपती कारखान्याचीही त्यांना बारकाईने माहिती आहे, त्यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादी कॉंग्रेससह छत्रपती कारखान्यासही फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पृथ्वीराज जाचक यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढविली होती आणि त्या नंतर सातत्याने ते पवारविरोधी भूमिका घेत आले होते. मात्र आता पुन्हा एकदा त्यांची घरवापसी होणार हे स्पष्ट झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT