पुणे

रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांची दारे बंदच 

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांची दारे अद्यापही उघडली नसल्याच्या घटना वारंवार पुढे येत आहेत. रुग्णालयांच्या या मनमानी कारभाराविरोधात रुग्णाचे नातेवाईकांकडून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सुरवात झाली आहे. 

खासगी रुग्णालयांमधील अत्यवस्थ रुग्णसेवा सुरू असल्याचे वारंवार सांगण्यात येते. पण, प्रत्यक्षात रुग्णाला दाखल करण्याची वेळ येताच कोणत्या ना कोणत्या कारणांनी त्याला ससून रुग्णालयाचा रस्ता दाखवला जातो. आलेल्या प्रत्येक रुग्णाला उपचारांसाठी दाखल करून घ्या, असे आदेश प्रशासनाने वारंवार काढले आहेत. मात्र, त्याची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे या घटनांमधून स्पष्ट होते. 

याच पार्श्वभूमीवर हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला दाखल न करता इतर रुग्णालयाचा रस्ता दाखविणाऱया रास्ता पेठेतील केईएम रुग्णालयविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे - क्लिक करा

हृदयविकाराचा झटका आलेल्या बाबुलाल आत्तार (वय ८५) या रुग्णाला केईम रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला, असा तक्रार अर्ज जाकिर बाबुलाल आत्तार यांनी समर्थ पोलीस ठाण्यात दाखल केला. याच रुग्णालयात रुग्णावर सुरवातीपासून उपचार होत आहेत. रुग्णांची सर्व माहिती रुग्णालयात आहे. अशा परिस्थितीतही रुग्णाला दाखल करून घेतले नाही. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात छातीचा एक्स-रे काढल्यानंतर रुग्णाला दाखल करता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालायतील विलगीकरण कक्षात जागा नाही, असे कारण त्यासाठी देण्यात आले. पण, त्यानंतरही रुग्णाला दाखल न करण्यावर रुग्णालय ठाम राहिले. तेथे उपचारांसाठी आलेल्या इतर रुग्णांनाही हाच अनुभव आला. त्यामुळे रुग्णाला उपचारांसाठी दाखल करून न घेण्याच्या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी यात करण्यात आली आहे. 

या बाबत केईएम रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला. पण, संपर्क होऊ शकला नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brazilian Model Larissa: मतदानातील '२२' चा मॅजिक! राहुल गांधींचा Viral Claim पाहून ब्राझिलियन मॉडेल म्हणाली, ‘ भारतात हे काय चाललंय?'

माेठी बातमी! 'मैत्रिणीचा खून केल्याचे सांगत तो पोलिस ठाण्यात हजर';मृतदेह टाकला नदीत, सांगली पाेलिस यंत्रणा हादरली

Gujarat Riots 2002 : गुजरात दंगलीतील तीन आरोपींची २३ वर्षांनी निर्दोष मुक्तता; अनेक साक्षीदारांचा मृत्यू , पुरावे गायब, तपास अधिकारीही...

धक्कादायक घटना! 'कुळकजाईत एकाचा खून'; मृतदेह शेतात नग्नावस्थेत, माण तालुक्यात उडाली खळबळ; नेमकं काय घडलं..

पोलिस भरतीत एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन! अर्जासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत; पहिल्यांदा मैदानी‌ नंतर एकाचवेळी लेखी परीक्षा; परीक्षेबद्दल वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT