सेनापती बापट रोड - सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) व लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑप.सोसायटी लिमिटेड पुणे आयोजित निबंध व संभाषण कौशल्य स्पर्धेतील विजेत्यांसह मृणाल पवार, पंढरी परब, सुशील जाधव. 
पुणे

‘कौशल्य’ दाखविणाऱ्यांवर कौतुकाची थाप

सकाळवृत्तसेवा

पुणे - विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता बहरावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन) आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त निबंध व संभाषण कौशल्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी झाला. 

इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा झाली. सकाळ माध्यम समूहाच्या संचालिका मृणाल पवार, लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीचे संचालक पंढरी परब, विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे व पिंपरी-चिंचवड, आंबेगाव, इंदापूर, बारामती, मावळ व सातारा जिल्ह्यातील विजेत्या विद्यार्थ्यांसह पालकही उपस्थित होते. 

सकाळ एनआयईच्या वतीने विविध विद्यार्थिप्रिय उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव देणे हा मुख्य हेतू आहे. शाळा बंद असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला व यश प्राप्त केले, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते. विद्यार्थ्यांनीही भविष्यात सकाळ आयोजित विविध उपक्रमात सहभागी व्हावे.
- मृणाल पवार, संचालिका, सकाळ माध्यम समूह

सकाळ माध्यम समूहाचे उपक्रम हे नेहमीच कौतुकास्पद असतात. विद्यार्थ्यांना एक प्रकारे मुक्त व्यासपीठ आहे. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदतच मिळते. शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांनी स्पर्धा व उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे.
- पंढरी परब, संचालक, लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑप.सोसायटी लिमिटेड 

लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित निबंध व संभाषण कौशल्ये स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व पालक यांचे अभिनंदन. शालेय जीवनात मिळालेली पारितोषिके भविष्यातील वाटचालीस प्रेरणा देत असतात. ग्राहकांच्या सदिच्छांमुळे सोसायटी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असून भविष्यातही ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न असेल. विद्यार्थ्यांनी शालेय वयातच बचतीची सवय लावली पाहिजे.
- सुशील जाधव, विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑप. सोसायटी लिमिटेड पुणे

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ना आलिशान गाड्या, ना हायटेक यंत्रणा! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये बी-टेक उमेदवाराचा 'गावरान' पॅटर्न; निवडणुकीत 'खटारा' घालतोय धुमाकूळ

दिल्ली-मुंबईच नाही तर नागपूरही प्रदुषणाच्या विळख्यात, शहरात किती आहे AQI?

Latest Marathi News Live Update : वसई विरार शहर पालिकेवर बहुजन विकास आघाडीचा महापौर विराजमान

पाकिस्तानची टरकली! इतर देशांकडे मदतीसाठी पळापळ, India vs Pakistan लढतीवर बहिष्कार टाकल्यानंतरची Inside Story

Nashik Mayor: नाशिकचे महापौर-उपमहापौर ठरले, शेवटच्या क्षणापर्यंत ठेवण्यात आला होता सस्पेन्स! विरोधकांकडूनही आव्हान

SCROLL FOR NEXT