agree.jpg 
पुणे

...म्हणून नागरिक घेताहेत गोठ्याकडे धाव

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : शहरातील अनेक गोठे मालकांसमोर जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हिरवा चारा मिळत नसल्याने शिल्लक कडब्यावर त्यांना अवलंबून रहावे लागत आहे. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर हे गावे आणि वाड्या-वस्त्यांनी बनले आहे. त्यामुळे, आजही शहरात भोसरी, पिंपरी, चिखली, जाधववाडी, कुदळवाडी यासारख्या भागांत दुभत्या जनावरांचे गोठे पहायला मिळतात. शहरात या गोठ्यांची संख्या सुमारे ५०० पेक्षा जास्त आहे. त्यातील अनेक गोठे मालकांना जनावरांसाठी हिरवा चारा कुठून मिळणार?, असा प्रश्न सतावत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथील गोठे मालक ज्ञानेश्वर शिंदे म्हणाले, "माझ्या गोठ्यात १० गायी आणि ६ म्हशी आहेत. या जनावरांना आळंदी येथून हिरवा चारा आणत होतो. मात्र, टाळेबंदीमुळे हिरवा चारा मिळणे आणि तो वाहून आणणे खूप अवघड झाले आहे. त्यामुळे, शिल्लक कडब्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. बहुतेक गोठा मालकांसमोर हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे."

चिखली येथील गोठामालक दिनेश यादव म्हणाले, "माझ्याकडे ३ गायी आणि ३ म्हशी आहेत. मात्र, आमची स्वत:चीच शेती असल्याने जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची समस्या भेडसावत नाही. मात्र, इतर गोठेमालकांना हिरव्या चाऱ्याची समस्या कमी-अधिक जाणवत आहे."

दूधाचे भाव जैसे थे- जनावरांना हिरवा चारा मिळत नसला तरी अनेक गोठेमालकांनी दूधाचे भाव स्थिर ठेवले आहेत. या गोठे मालकांकडून खासगी डेअरींना देखील दूध पाठविले जाते. तर काहींचा घरोघरी रतीब चालू असतो. गाईचे दूध ४० ते ४५ रूपये तर म्हशीच्या दूधाची ५० ते ६० रूपये प्रति लिटर या भावाने विक्री केली जात आहे. बहुसंख्य ग्राहक हे नियमित ग्राहक असल्याने गोठे मालकांनी रतीब घालताना दूधाचे भाव वाढविलेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT