पुणे

नारायणगावचा नळपाणी पुरवठा योजनेचा प्रश्न लागला मार्गी

रवींद्र पाटे

नारायणगाव : नारायणगाव शहर व परिसराला पिण्याच्या पाण्याचा नळ पाणी पुरवठा  करण्यासाठी पेयजल कार्यक्रमा अंतर्गत सुमारे बावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पुढील वर्ष भरात या योजनेचे काम पूर्ण होईल. अशी माहिती लोक नियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून येथील प्रभाग क्रमांक चार मध्ये ग्रामपंचायत निधीतून करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे उदघाटन सरपंच पाटे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाला बँकेचे माजी अध्यक्ष अशोक गांधी होते. महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघ यांच्यावतीने आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सरपंच पाटे यांचा सत्कार या वेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमास माजी उपसरपंच संतोष दांगट, आरिफ आतार, सदस्य राजेश बात्ते, संतोष पाटे, शरद घोंगडे आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंच पाटे म्हणाले, ''नारायणगाव शहर व परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या बरोबर स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य  व सांडपाणी व्यवस्थापन या समस्या वाढत आहेत. नागरिकांना रोज सुमारे १५ लाख लिटर पिण्याच्या पाण्याची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी पेयजल कार्यक्रमा अंतर्गत शुद्धीकरण प्रकल्प व नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे बावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पाणी साठवण टाकी व शुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्राम्हण सेवा संघ, ग्रामपंचायत नारायणगाव व जिल्हा वार्षिक निधि या माध्यमातून सुमारे ७६ लाख रुपये खर्च करून गॅस शवदाहीनेचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे कोरोना काळात अंत्यसंस्कार करण्याची समस्या दूर झाली. मीना नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचे एकत्रीकरण करून  सांडपाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात महामार्गाच्या पूर्व भागातील जमा होणाऱ्या सांडपाण्याचे एकत्रिकरणाचे काम पुर्ण झाले आहे. प्रभाग क्रमांक चार मध्ये बगीच्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे काम सुरू केले आहे. सूत्रसंचालन बात्ते यांनी केले.

मागील दोन वर्षात नारायणगाव ग्रामपंचायतिच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाली आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यास ग्रामपंचायतिला यश आले आहे. सरपंच पाटे यांच्या माध्यमातून केलेली विकास कामे दर्जेदार आहेत. -अशोक गांधी, माजी अध्यक्ष लाला बँक

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT