Production of honey and royal jelly is beneficial to farmers 
पुणे

मध आणि  रॉयल जेली निर्मिती शेतकऱ्यांना फायदेशीर

रवींद्र पाटे

नारायणगाव : ग्रामीण भागातील शेतकरी, महिला गटांसाठी मधुमक्षिका पालन व मध निर्मिती व्यवसाय फायदेशीर आहे.या व्यवसायासाठी  शासन सुमारे ऐशी टक्के अनुदान देते.प्रशिक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांना मध संकलन पेट्या दिल्या जातात. पौष्टिक व औषधी असल्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत मध व मध पोळ्यात अल्प प्रमाणात तयार होणाऱ्या रॉयल जेलीला मोठी मागणी आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अशी माहिती मध्यवर्ती मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहाय्यक संचालिका डॉ. लक्ष्मी राव यांनी दिली. कृषि विज्ञान केंद्र (के.व्ही.के) नारायणगाव व मध्यवर्ती मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यावतीने मध निर्मिती, रॉयल जेली उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उदघाटन कृषि विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांच्या हस्ते झाले.या वेळी ग्रामोन्नती मंडळचे अध्यक्ष प्रकाश पाटे, केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ  प्रशांत शेटे, डॉ. दत्तात्रय गावडे, श्वेता वायाळ, राहुल काळे आदी मान्यवर, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील वीस मधुमक्षिका पालक शेतकरी, महिला बचत गटातील महिला, युवक-युवती उपस्थित होते.  

आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी

डॉ. लक्ष्मी राव यांनी मध्यवर्ती मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या विविध योजना, मधुमक्षिका पालन, रॉयल जेली उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया,साठवणूक या विषयी मार्गदर्शन केले .मेहेर म्हणाले की, ''मधुमक्षिका पालन करताना मधुमक्षिकांचा उपयोग मध निर्मिती बरोबर  परपरागीकारणासाठी होतो. यामुळे फळ धारणा होण्यासाठी मदत होऊन शेती उत्पादनात वाढ होते.''

डॉ. दत्तात्रय गावडे यांनी परिसरामध्ये आढळणार्‍या मधुमक्षिका, प्रकार व त्यांचे मानवी जीवनातील महत्व,मधुमक्षिकांचा वापर करून शेतकर्‍यांच्या उत्पादनात कशा प्रकारे वाढ होईल या बाबत  मार्गदर्शन केले.

बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार

डॉ. दत्तात्रय गावडे( पीक संरक्षण शास्त्रज्ञ): मध पोळ्यात आढळणारा रॉयल जेली हा पांढरट पिवळसर घट्ट पदार्थ आहे.पाणी, प्रथिने, साखर, स्निग्ध पदार्थ, खनिजे याबरोबरच जीवनसत्त्वे आणि बायोप्रोटिन्स यासारखे उपयुक्त अन्नघटक रॉयल जेलीत असतात. प्रति दिन दोनशे मिलीग्रॅम रॉयल जेली मानवी शरीरास आवश्यक आहे. मधमाश्या आपल्या अळ्यांना तसेच राणी माशीला खाऊ घालण्यासाठी पोळ्यात रॉयल जेली तयार करतात.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुमचा पुलवामा हल्ल्याशी संबंध, मुंबईत २१ वर्षीय तरुणीला डिजिटल अरेस्ट करत ३२ लाखांना गंडा; क्रिकेटरसह ७ जणांना अटक

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्म क्रमांक 2 पुढील 52 दिवस राहणार बंद; मध्य रेल्वेचा निर्णय

Iran Israel Conflict: इराणला शस्त्रसंधी अमान्य, मध्यस्थांचा प्रस्ताव फेटाळला; अमेरिकेन तळांना केलं टार्गेट!

Jalna News: बसथांब्याच्या दयनीय अवस्थेमुळे प्रवाशांचे होताहेत हाल; जालना-वडिगोद्री महामार्गावरील प्रकार; उघड्यावरच करावी लागते बसची प्रतीक्षा

Ashok Kharat: दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए...; भोंदू अशोक खरातच्या चौकशीत धक्कादायक खुलासा! काळ्या कारनाम्याचे गुपित उघड

SCROLL FOR NEXT