Production of Sanitizer Cylinder for Disposal of Coronavirus at Public Space by DRDO
Production of Sanitizer Cylinder for Disposal of Coronavirus at Public Space by DRDO 
पुणे

डीआरडीओने निर्जंतुकरणासाठी केली सॅनिटायझर सिलेंडरची निर्मिती

सकाळवृत्तसेवा

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वतीने 'मेक इन इंडिया'च्या संकल्पने अंतर्गत सार्वजनिक जागेच्या निर्जंतुकरणासाठी सॅनिटायझर सिलेंडरची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेत दिल्ली येथील सेंटर फाॅर फायर एक्सपलाेझिव्ह अॅन्ड एनव्हायरमेंट सेफ्टी यांच्या माध्यमातून दाेन सॅनिटायझर उपकरणे तयार करण्यात आली आहे. इमारतीत अग्निशामक सिलेंडर असताे, तशाप्रकारचा विविध आकारातील सॅनिटायझर सिलेंडर तयार करण्यात आले आहेत.


फवारणी करण्याकरिता सहजरित्या याला उचलून घेऊन जाण्यासाठी या सिलेंद्रला ट्रॉली देण्यात आली आहे. या सॅनिटायझर सिलिंडरच्या माध्यमातून 'हायपाेक्लाेरार्इड'ची फवारणी केली जाते. सुमारे 300 मीटर पर्यंतचा परिसर निर्जंतुकरण करण्यासाठी हवा अाणि रासायनिक द्रवाचा वापर करुन फवारणी करण्यात येते. यामध्ये रुग्णालयाचे स्वागतकक्ष, डाॅक्टरांची केबीन, कार्यालये, मेट्राे, रेल्वे स्टेशन, बस स्थानक अादी जागांवर याचा वापर करणे सोपे आहे. 

ट्राॅलीचा वापर करुन हा माेठा सॅनिटायझर सिलेंडर  तीन हजार मीटर पर्यंत वापरता येऊ शकताे. या सिलेंडरची द्रवक्षमता 50 लीटर असून 12 ते 15 मीटर पर्यंत फवारणी जाते. सध्या या सॅनिटायझर सिलिंडरचा वापर दिल्ली पाेलीसांनी सार्वजनिक ठिकाणांवर सुरू केला आहे. 

दरम्यान हे सिलिंडर देशातील विविध संस्थांना, रुग्णालयांना उपलब्ध करून दिले जाऊ शकते. मात्र त्यासाठी संस्थेने व रुग्णालयांनी डीआरडीओशी संपर्क साधावा, असे आवाहन डीआरडीओच्या वैज्ञानिकाने केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT