adar poonawalla 
पुणे

सात ते आठ कोटी डोसची दरमहा निर्मिती - आदर पूनावाला

सकाळवृत्तसेवा

पुणे - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्रत्येक महिन्याला कोरोनावरील लशीचे सात ते आठ कोटी डोस तयार केले आहेत. या लशीचे भारताप्रमाणेच परदेशातही वितरण करण्यात येईल. सध्या याचेच नियोजन आखले जात आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली. भारताप्रमाणेच परकी देशांना नेमके किती डोस द्यायचे याचे नियोजन आम्ही आखत आहोत, यासाठीचा आराखडा आरोग्य मंत्रालयाने तयार केला आहे. लशीची वाहतूक अधिक वेगाने व्हावी म्हणून खासगी भागधारकांच्या ट्रक, व्हॅनचा आधार घेतला जाणार असून, शीतगृहांची व्यवस्थाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जगातील अनेक देशांकडून कोरोनावरील लशीबाबत देशाच्या पंतप्रधान कार्यालयाकडे विचारणा होऊ लागली असून या सगळ्या देशांना सीरम इन्स्टिट्यूटकडून लशीचा पुरवठा करण्यात येईल असे ते म्हणाले. आम्ही सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला आमचे लोक आणि देशाची काळजी घ्यावी लागेन. आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेलाही लस पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

दोनशे रुपये एवढ्या दराने आम्ही एक कोटी एवढे डोस भारत सरकारला देणार आहोत. केंद्र सरकारच्या विनंतीनंतर सामान्य माणसाला आधार देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. सामान्य माणूस, गरीब लोक, आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार आदी घटकांना आधार देण्यात येईल. खासगी बाजारपेठेत आम्ही एक हजार रुपयांना या लशीची विक्री करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लस रवाना
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामध्ये सीरम इन्स्टिट्यूटमधून आज देशातील तेरा ठिकाणांवर कोरोनाची लस रवाना झाली. यामध्ये दिल्ली, कर्नाल, अहमदाबाद, चंडीगड, लखनौ, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्‍वर, कोलकता आणि गुवाहाटी या शहरांचा समावेश आहे. पुण्यातील मदत साहाय्य पुरविणारी कंपनी कूल-एक्स कोल्ड चेनने या लशीच्या वाहतुकीचे आव्हान पेलले असून त्यासाठी अत्याधुनिक ट्रकची मदत घेण्यात आली आहे. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

Pune News: कामावर गेला, पण घरी परतलाच नाही! २४ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, राजगड तालुक्यातील शिरकोली येथील घटना..

MHT CET 2026: राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बीई, बी.टेकच्या नोंदणीसाठी मुदतवाढ, प्रवेश घेण्याची शेवटची संधी..

Pune News: पालखी अवघ्या तासांवर; उरुळी कांचनमध्ये महामार्गावर चिखलाचा राडारोडा, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : मुक्ताईंच्या पालखीचे बीडमध्ये आगमन

SCROLL FOR NEXT