पुणे

आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी व्यावसायिक वेबपोर्टल

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती निमित्त आयोजित सेवासप्ताह अंतर्गत आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये महिला सक्षमीकरणा करीता उपयुक्त असलेले Vikasini.in या व्यावसायिक वेबपोर्टलचे उद्‌घाटन भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते मोरवाडी येथील भाजप कार्यालयात झाले. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक मोरेश्‍वर शेडगे, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, युवा मोर्चा चिटणीस मुक्ता गोसावी, विक्रांत गंगावणे, प्रकाश चौधरी, निलेश नेस्त्री आदी उपस्थित होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत हे वेबपोर्टल मुक्ता गोसावी यांनी विकसित केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून महिला व्यावसायिक व बचत गटांना नोंदणी प्रक्रीया पुर्ण करून त्यांची उत्पादने ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करता येतील. तसेच महिलांना व बचतगटांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्याची व्यवस्था या वेबपोर्टलच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामुळे महिला व बचतगटांना उद्योग व व्यवसाय वाढीसाठी मदत होऊन रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती आमदार लांडगे यांनी दिली. 

Vikasini.in या पोर्टलच्या माध्यमातून प्रथमत: शहरातील बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. महिलांच्या आवडीनुसार त्यांना कुठल्या उद्योग क्षेत्रात रस आहे, महिला कोणता उद्योग सुरू करू शकतात त्याबाबतची माहिती घेऊन त्यासाठी इच्छुक महिलांचे गट करून उद्योग-व्यवसाय संबधित प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे. अशी माहिती युवा मोर्चा चिटणीस मुक्ता गोसावी यांनी दिली. 

दरम्यान, महापौर व उपस्थित मान्यवरांनी वेबपोर्टलची माहिती जाणून घेतली. तसेच शहरातील ज्या महिला सद्यस्थितीत स्वत:चे उत्पादन करीत आहेत. त्यांना मर्यादीत स्वरुपातच बाजारपेठ उपलब्ध होत आहे. परंतु या वेबपोर्टलच्या माध्यमातून त्यांना देशभरात ऑनलाईन विक्री करता येणार आहे. महिला सबलीकरणासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असून यातून महिलांना आर्थिक बळकटी मिळणार असल्याने त्यांचे उद्योग-व्यवसायाला चालना मिळणार आहे. याकरीता प्रत्येक प्रभागात पदाधिकारी व नगरसेवकांनी महिला बचत गटांना या वेबपोर्टलबाबत माहिती होण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सत्तारुढ पक्षनेते ढाके यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT