covid hospital  sakal media
पुणे

प्राध्यापकांनीच केले कोविड हॉस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट

डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील यंत्र स्वयंचल व उपकरणीकरण अभियांत्रीकी विभागातील एकूण सोळा प्राध्यापकांनी कोविड हॉस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट केले. ऑडिटमुळे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची बचत होत आहे. होणारे संभाव्य धोके टळले आहेत. या कामाची दाखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव व तंत्रशिक्षण संचालनालय संचालक डॉ.अभय वाघ यांनी तंत्र शिक्षण संचालनालय व संस्थांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.” अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. पंत यांनी दिली.

पुण्याचे अतिरिक्त जिल्हा अधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या नियंत्रणाखाली तंत्र शिक्षण संस्थामार्फत २२५ अभियंता प्राध्यापकांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिटचे काम वेळेत पूर्ण केले. त्यामध्ये शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द येथील डॉ एस.एस.देशपांडे, ए.एस.कौशल, जे.एम.अरकल, एन.डी.पडवळे, डॉ मिलिंद बोनगुलवार, डॉ के. एच. कौडकी, डॉ. एस. व्ही. करमारे, डॉ. एस. व्ही. क्षीरसागर, ए. जे. भोसले, आर. पी. काकड, एस. डी. पाटील, डी. एस. लेंगरे, एस. आर. पाटील, एन. एम. काराजंगी, डॉ. एम. जे. पाबळे, व्ही. वाय. ढेपे यांचा समावेश होता. त्यांनी जुन्नर, खेड व पुरंदर तालुक्यातील ६२ कोविड हॉस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट पूर्ण केले.

ऑक्सिजन टॅंकपासून ते पाइपलाईन व प्रत्यक्ष पेशंट वार्डात ऑक्सिजन वहन करणाऱ्या उपकरणा मधील गळती, दुरुस्तीबाबत तपासणी, ऑक्सिजन प्लांटजवळ कुठल्या ही प्रकारची ज्वलनशील वस्तू नाही याची पडताळणी केली. पाईप लाईनमधील भेगा व त्यामधून होणारी गळती शोधण्यासाठी सोनार सिस्टीमचा वापर रुग्णालये करत आहेत की नाही याची खात्री केली. ऑक्सिजनचा वापर काटकसरीने होण्यासाठी रुग्ण बाथरूमला गेल्यानंतर व रुग्ण जेवण करताना ऑक्सिजन बंद करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे ऑक्सिजन बचत झाली. -डॉ. एस. एस. देशपांडे प्राध्यापक, शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT