pune.jpg
pune.jpg 
पुणे

रशियातील यूथ लीडरशीप आंतरराष्ट्रीय परिषदेत पुणे विद्यापीठातील प्राध्यपकाचा सहभाग

मीनाक्षी गुरव-सरोदे

पुणे : ‘ब्रिक्स’ देशांच्या उपक्रमांतर्गत रशिया सरकारने आयोजित केलेल्या “न्यू जनरेशन यूथ लीडरशीप” या परिषदेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी विभागातील सहायक प्राध्यापक विक्रमादित्य राठोड यांची निवड झाली आहे. ही परिषद ९ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

या परिषदेत राठोड हे भारतीय संस्कृती आणि भारतीय मुत्सद्देगिरी या विषयावर मांडणी करणार आहेत. या व्यतिरिक्त तिथे होणाऱ्या महत्वाच्या चर्चासत्रात देखील सहभागी होणार आहेत. रशियाच्या मोस्को आणि स्टारवपोल या शहरात होणाऱ्या या परिषदेसाठी जगभरातील २५०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यांची निवड प्रक्रिया गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होती. त्यात भारतातून केवळ चौघांची निवड झाली असून, त्यात राठोड यांचा समावेश आहे. राठोड यांचे प्राथमिक शिक्षण राजस्थानमधील बारमेर येथे झाले. त्यांनी दिल्ली
 

विद्यापीठातून आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केले. सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी विभागात सहायक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT