Pune_University
Pune_University 
पुणे

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण दुर्गमच; सॅटेलाईट योजनेकडे महाविद्यालयांनी फिरवली पाठ!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी राज्य सरकारने महाविद्यालयांना सॅटेलाईट केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाईल, त्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले होते. मात्र हे केंद्र विनाअनुदानित असल्याने महाविद्यालयांनी या योजनेकडे पाठ फिरवली असून, केवळ १० प्रस्ताव आले आहेत. 

राज्य शासनाने महाविद्यालयापासून दोनशे किलोमीटरच्या परिघात आणि विद्यापीठ कार्यक्षेत्रात सॅटेलाईट केंद्र असावेत, या केंद्राच्या माध्यमातून कौशल्य अभ्यासक्रम, दूरशिक्षण अभ्यासक्रमाच्या दृष्टीने माहिती तंत्रज्ञानाची उपलब्ध करून द्यावी हा उद्देश आहे. त्यासाठी सॅटेलाईट केंद्र सुरू करण्याबाबत विद्यापीठाकडे अर्ज करण्याचे आवाहन महाविद्यालयांना करण्यात आले होते. पुणे विद्यापीठाने यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत दिली होती. 

पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या जास्त असली तरी, सॅटेलाईट केंद्र सुरू करण्यासाठी एकूण दहा महाविद्यालयांकडून प्रस्ताव सादर झाले आहेत. या अर्जांची पडताळणी करून त्यातील त्रुटी दूर केल्या जातील. सुधारीत प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाईल, अशी माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली.

सॅटेलाईट केंद्र विनाअनुदानित तत्वावर असणार आहेत. शासनाच्या मदतीशिवाय यामध्ये महाविद्यालयांनाच गुंतवणूक करावी लागणार आहे. तसेच महाविद्यालयांना सॅटलाइन केंद्रासाठी सर्वेक्षण, पाच वर्षाचा आढावा, प्रस्तावित अभ्यासक्रम या माहितीसह अर्ज करण्यासाठी वेळ कमी असल्याने महाविद्यालयांना प्रस्ताव सादर करता आला नाही, असेही अधिकार्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT