A meeting has been held in the Gram Panchayat Hall to decide whether Wagholi should be included in the Municipal Corporation or not.jpg 
पुणे

वाघोली ग्रामपंचायतीच्या प्रस्तावीत कचरा प्रकल्प जागेची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

वाघोली (पुणे) : वाघोली ग्रामपंचायतीच्या प्रस्तावीत कचरा प्रकल्प जागेची पाहणी हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर व गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी केली. येत्या काही दिवसात ही जागा ग्रामपंचायतीला हस्तांतरित होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बारवकर यांनी सांगितले.

वाघोलीत सध्या एक प्रकल्प कार्यान्वित आहे. मात्र त्याच्या कार्यसक्षमतेची कोणतीच शाश्वती नाही. या प्रकल्पाच्या बाजूलाच कचरा गोळा केला जातो. तो कचरा अधून मधूम पेटतो. त्याचा धूर व दुर्गंधी याबाबत नागरिक वारंवार तक्रार करतात. दुसरा कचरा प्रकल्प उभारल्यास या समस्या कमी होतील, यासाठी ग्रामपंचायतीने पाऊले टाकली. कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे जागेची मागणी केली आहे. ही जागा पाहणी शनिवारी अधिकाऱ्यांनी केली.

हे ही वाचा : वाघोली : आमचा गाव आणि आमची ग्रामपंचयातच बरी 
 
नियोजित कचरा प्रकल्प हा पत्राशेडमध्ये बंदीस्त स्वरुपात करण्यात येणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे पर्यावरण व इतर हानी होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. जागा पाहणी अहवाल त्वरित जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असून येत्या काही दिवसात ही जागा ग्रामपंचायतीला हस्तांतरित होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रांताधिकारी बारवकर यांनी सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे, उपसरपंच महेंद्र भाडळे, माजी उपसपंच मारुती गाडे, ग्रामविकास अधीकारी अनिल कुंभार व नागरिक उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT