Protest khatik traders due to closure of cantonment slaughter house pune sakal
पुणे

Pune News : कॅन्टोन्मेंट कत्तलखाना बंद केल्याने खाटीक व्यावसायिकांचे आंदोलन

पुणे कँटोन्मेंट बोर्डाचा कमेला कोंढवा येथील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद केल्याने लष्कर भागातील खाटिक व्यावसायिकांनी आज बोर्ड कार्यालयात आंदोलन

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट - पुणे कँटोन्मेंट बोर्डाचा कमेला कोंढवा येथील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद केल्याने लष्कर भागातील खाटिक व्यावसायिकांनी आज बोर्ड कार्यालयात आंदोलन केले. कॅम्प येथील छत्रपती शिवाजी मार्केट येथे खाटीक व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात मटन मार्केट आहे.

यावेळी जनावरांची काटाई करण्याकरिता मागील १२५ वर्षाहून जास्त कालावधीपासून कोंढवा येथे कत्तलखाना सुरू आहे. यावेळी हा कत्तलखाना बंद करून पुणे महपालिकेच्या कत्तलखान्यात कँटोन्मेंटच्या व्यवसायिकांकरिता सोय करावी अशा आशयाचे विनंती पत्र नुकतेच बोर्डाचे सीईओ सुब्रत पाल यांनी महापालिका आरोग्य विभागाचे आयुक्त आशिष भारती यांना दिले होते.

या पत्राला अनुसरून महापालिका आयुक्तांनी  २५ एप्रिल रोजी ठराव मान्य करून यामध्ये महापालिकेच्या जनावरांची कटाई झाल्यानंतर कॅन्टोन्मेंटच्या जनावरांची काटाई करण्याची अनुमती दिली होती. स्थायी समितीच्या ठरावात मोठ्या जनावरांसाठी प्रत्येकी ८० रुपये तर लहान प्रत्येकी दोन जनावरांसाठी  ३० रुपये प्रमाणे दर निश्चित करण्यात आले.

तसेच त्या जनावरांची घेऊन जाण्याची जबाबदारी ही कँटोन्मेट बोर्डाची राहिल असे पत्रक बोर्डाला मनपाने पाठवले होते. त्यानुसार बोर्डाच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव पारित करून सीईओ पाल यांनी जनावरांची वाहतूक करण्याची जबाबदारी खाटिक व्यावसायिकांची राहील आणि व्यावसायिकाने पालिकेला ठरलेल्या दर द्यावा अशा आशयाचा अध्यादेश काढला होता.

मात्र या बोर्डाच्या निर्णयाला खाटिक व्यावसायिकांनी विरोध दर्शवला आहे. यावेळी ऑल इंडिया जमियतुल कुरेश ॲक्शन कमिटीचे शहर अध्यक्ष हसन कुरेशी म्हणाले की, मनपाचे दर आम्हाला परवडणारे नाही, कत्तलखाना बंद करणे म्हणजे आमच्या नैसर्गिक न्याय तत्वाची पायमल्ली असुन त्याचप्रमाणे भारतीय संविधानाने भारताचे नागरिक म्हणुन आम्हाला बहाल केले आहे.

या निर्णयाविरूध्द आम्ही सदर व्यवसायाशी निगडीत असणारी सर्व मंडळी यांनी सनदशीर मार्गने न्याय मिळवण्याकरिता जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, सदरचे प्रकरण हे आज रोजी न्यायप्रविष्ठ असल्याकारणाने हे प्रकरण निकाली निघण्याअगोदर, कत्तलखाना बंद करणे हे न्यायाला धरून नाही.

त्यामुळे कत्तलखाना परस्पर बंद करण्याचा घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा सनदरशीर व कायदेशीर मार्गाने लोकशाहीला अभिप्रेत असणान्या तत्वानुसार तीव्र आंदोलन करू, असा इशारा कमिटीने पत्रकाद्वारे दिला आहे.

यावेळी कमिटीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक कुरेशी, पुणे शहर अध्यक्ष हसन कुरेशी, उपाध्यक्ष. आरिफ कुरेशी, सेक्रेटरी. महमूदलाल कुरेशी, मुनव्वर कुरेशी, आरिफ चौधरी, अनिस कुरेशी, हाजी इकबाल कुरेशी, हाजी इर्शाद पटेल, इरफान कुरेशी, हाजी बिलाल कुरेशी, आबू सुफियान कुरेशी, हाजी मईनुद्दीन कुरेशी, हाजी अबरार कुरेशी, फारुख कुरेशी आदी आंदोलन प्रसंगी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain News : पुण्यात ढगफुटी सदृश्य पावसाने घरे, गाड्या पाण्याखाली, आज शाळांना सुट्टी जाहीर; प्रशासनाचे नागरिकांना सर्कतेचे आवाहन

Britain News: 'ब्रिटनमध्ये स्थलांतरितांविरोधात मोर्चा'; उजव्या विचारसरणीच्या समर्थकांचा पोलिसांबरोबर संघर्ष

Mumbai Monorail Breakdown : भर पावसात ट्रॅकवर अडकली मोनो रेल, प्रवाशांना बाहेर काढण्यात यश; दोन महिन्यांत दुसरी घटना

कसलं व्यसन नाही, तंदुरुस्त अन् आनंदी आयुष्य; तब्येत बरी नाही मेसेज केल्यानंतर १० मिनिटात सहकाऱ्याचं निधन, बॉसला धक्का

Panchang 15 September 2025: आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्र वाचावे व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT