pmc sakal
पुणे

ॲमिनिटी स्पेसप्रकरणी बाणेरमध्ये निषेध मोर्चा

ॲमिनिटी स्पेसमध्ये बाणेरमधील ४२, तर बालेवाडी येथील २३ भूखंडांचा समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

बालेवाडी : महापालिकेकडून २६९ ॲमिनिटी स्पेस (सुविधा क्षेत्र) च्या जागा दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी बाणेर येथे प्रभाग क्रमांक ९ (बाणेर- बालेवाडी- पाषाण)मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच सोसायटीतील नागरिकांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. (Pune News)

महापालिकेने शहरातील ॲमिनिटी स्पेस भाड्याने देण्यासाठी तयार केलेल्या यादीत सर्वाधिक जागा या बाणेरमधील ४२, तर बालेवाडी येथील २३ भूखंडांचा समावेश आहे. या जागा या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी आहेत आणि त्या नागरिकांसाठी असल्या पाहिजेत, कोणत्याही परिस्थितीत या जागा बिल्डरच्या घशात जाता कामा नयेत, त्यामुळे या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी बाणेर येथील बाबूराव सायकर चौकात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी सोसायटीतील प्रतिनिधींनी त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याबद्दल संताप व्यक्त केला. या प्रसंगी आनंद गडकर, अरुण सामंत, सुषमा ताम्हाणे, राखी श्रीराव, पुनम विधाते, प्रा. रूपाली बालवडकर, अर्जुन शिंदे, डॉ. सागर बालवडकर, जंगल रणवरे, समीर चांदेरे, नितीन कळमकर, विशाल विधाते, संजय ताम्हाणे,,अर्जुन ननावरे, मनोज बालवडकर, डॉ. मीरा विधाळे, प्राची सिद्दीकी आदींसह बाणेर बालेवाडीमधील सोसायटीचे सभासद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, विक्रोळीजवळ तांत्रिक बिघाड; लोकल ३० ते ४० मिनिटं उशिरा, स्थानकांमध्ये गर्दी

Stock Market Today: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात! IT शेअर्सचा जोरदार कमबॅक; पाहा कोणते शेअर्स वाढले?

T20 WC, IND vs ZIM: टिम इंडियात ट्विस्ट... संघाचा विश्वासार्ह फिनिशर परतला; आता समीकरणच बदलणार?

आमच्यामध्ये वाद आहेत... भावासोबतच्या नात्यामधील तणावावर पहिल्यांदाच बोलला अजिंक्य देव; म्हणाला- एक भाऊ म्हणून ...

केंद्राकडून निधी मिळेना, मंत्र्यांचं रडगाणं; पाठपुरावा करा म्हणत राहुल नार्वेकरांनी विधानसभेत दोन नेत्यांना फटकारलं

SCROLL FOR NEXT