सुधीर फराटे sakal
पुणे

एका निनावी पत्रादवारे आक्षेपार्ह टिपण्णी दिलेल्या धमकीचा निषेध

करणाच्या तपासासाठी येत्या पाच दिवसांचा 'अल्टीमेटम' दिला

सकाळ वृत्तसेवा

शिरूर - हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांच्या जिविताबद्दल, एका निनावी पत्रादवारे आक्षेपार्ह टिपण्णी करून दिलेल्या धमकीचा निषेध नोंदवितानाच; शिरूर शहरातील सत्तांतर्गत संघर्षाचा हा परिपाक असल्याचा थेट आरोप शिरूर तालुका शिवसेनेने केला आहे. याबाबत निर्माण झालेले संशयाचे मळभ दूर व्हावेत यासाठी तातडीने या प्रकाराचा शोध लावावा, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी केली आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी येत्या पाच दिवसांचा 'अल्टीमेटम' दिला जात आहे. त्या मुदतीत या निनावी पत्राचा बोलविता धनी न सापडल्यास शिरूर पोलिस ठाण्यासमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा फराटे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. शिवसेनेचे जिल्हा सल्लागार अनिल काशीद, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, तालुका संघटक कैलास भोसले, युवासेनेचे तालुका अधिकारी सुनिल जाधव, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल पवार आदी यावेळी उपस्थित होते. निनावी पत्रातील मजकूर पडताळून पाहील्यास पत्रलेखक असलेली व्यक्ती उद्योजक प्रकाश धारिवाल परिवाराची व त्यांच्या नेतृत्वाखालील शिरूर शहर विकास आघाडीची हिंतचिंतक असल्याचे दिसत आहे, असा आरोप फराटे यांनी केला.

ते म्हणाले, "स्व. रसिकभाऊ धारिवाल, स्व. शहिदखान पठाण, स्व. किसनभाऊ बरमेचा; यांच्यासह माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार बाबूराव पाचर्णे, पोपटराव गावडे व उद्योजक प्रकाश धारिवाल यांचा शिरूर शहराच्या विकासात मोलाचा सहभाग असूनही या नेत्यांनी शहरातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्यात राजकारणविरहीत प्रयत्न केलेले आहेत. मात्र, आमदार पवार व त्यांच्या परिवाराचा आगामी नगर परिषद निवडणूकीच्या निमीत्ताने शहराच्या राजकारणात हस्तक्षेप वाढला असून, तो पत्रलेखकाला मान्य नसल्याचे निनावी पत्रातील मजकूरातून दिसून येते. तेव्हा आमदारांनीही या पत्रातून आत्मचिंतन करावे व हस्तक्षेप होत असल्यास तो थांबवावा.

शिरूर शहरात व एमआयडीसी मध्ये काम, व्यवसाय करणा-या तरूणांना सत्तेचा वापर करून व्यक्तीगत त्रास देण्याचे काम आमदार व त्यांच्या नातेवाईकांकडून चालू असल्याचे पत्रात नमूद केले असून, ते खरे असेल तर आमदारांनी हे देखील टाळले पाहिजे." विकासकामे केली म्हणून धमकी दिल्याचा अपप्रचार आमदार व त्यांचे समर्थक करीत असून, हा अजब तर्क असल्याचा टोला फराटे यांनी लगावला. या पार्श्वभूमीवर आमदारांनी विचार करावा व कुटूंबिय व नातेवाईकांना इतरांच्या कारभारात हस्तक्षेप करण्यापासून रोखावे, नगरपरिषदेत नगराध्यक्ष व नगरसेवक सक्षमपणे काम करीत असताना आमदारांच्या सौभाग्यवती हस्तक्षेप करतात हे न समजण्यासारखे आहे. पत्रातील मजकूराचा खुलासा करण्याची जबाबदारी आमदारांची असून, पंचायत समितीचे बीओटीवरील कॉम्प्लेक्स, एसटी स्थानकाच्या विकासाचे बीओटी वर चालू असलेले काम, टपरीधारकांचे पुनर्वसन, शहरातील पाबळ फाटा व कुकडी कॉलनीच्या जागेवर डोळा यासंदर्भात निनावी पत्रातून झालेल्या गंभीर आरोपांवरून आमदारांविषयी संशयाचे मळभ दाटले असल्याने त्यांनी खुलासा करावा, अशी आग्रही मागणीही फराटे यांनी केली.

आगामी घोडगंगा साखर कारखाना, नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांना सामोरे जाताना दोन वर्षांत सत्ताधारी आमदार म्हणून कोणतेही विशेष काम झालेले नाही व कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे दीर्घकाळ हाती असूनही घोडगंगा कारखाना त्यांना सुस्थितीतीत आणता आला नाही. हे अपयश झाकण्यासाठी व सहानुभूती मिळविण्यासाठी हा राजकीय 'स्टंट' तर नाही ना, अशी शंकाही फराटे यांनी उपस्थित केली. निनावी पत्राच्या मागील व्यक्तीला शोधताना त्या पत्रातील आरोपांबाबत पुरावा देऊन मुद्देसूद खुलासा करावा व सत्यस्थिती जनतेसमोर आणावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एलपीजी ग्राहकांना मोठा झटका, सिलिंडरच्या किमतीत वाढ

Vishwas Patil: मराठी साहित्याचा ऱ्हास थांबवा: अध्यक्ष विश्वास पाटील; अन्यथा खूप वाईट दिवस नेमकं काय म्हणाले?

Yearly Numerology 2026: मूलांक 1 आणि 5 साठी 2026 ठरणार शुभ; राहील सूर्याची विशेष कृपा, वाचा अंकज्योतिषनुसार तुमचे वार्षिक राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - 01 जानेवारी 2026

Morning Breakfast Recipe: नवीन वर्षाची हेल्दी सुरुवात! पहिल्याच दिवशी नाश्त्यात बनवा पौष्टिक पराठा, रेसिपी आहे खूपच सोपी

SCROLL FOR NEXT