Pune-University 
पुणे

परीक्षेबाबत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बैठक आंदोलकांनी हाणून पडली

सकाळवृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या नियोजनासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक दुपारी सुरू होती. मात्र विद्यापीठात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असताना देखील सुरू असलेली ही बैठक आंदोलकांनी हाणून पडली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या नियोजनाबाबत सध्या विविध स्तरावर बैठका सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या अतिथी गृहात गुरूवारी दुपारी बैठक सुरू होती आणि त्यात अधिकारी आणि काही शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. हे कळताच आंदोलकांपैकी ४०-५० जणांनी बैठकीच्या ठिकाणी मोर्चा वळविला. बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असताना बैठक का घेतली, असेही संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्यात आले. तसेच ताबोडतोब बैठक बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून बैठक बंद पाडल्याची माहिती पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समितीचे सहचिटणीस शिवाजी उत्तेकर यांनी दिली. तर याबाबत विद्यापीठाची बाजू जाणून घेण्यासाठी डॉ. काकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,"विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सेवा पुरवठादारांसमवेत बैठक होती. ही बैठक सुरळीत झाली. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना फक्त बैठकीत त्यांना सहभागी करून घेऊ नये, असे आंदोलकांचे म्हणणे होते."

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्रात धक्कादायक घटना; भाजप मंत्र्यांच्या भावाला अन् पुतण्याला मारहाण, Video समोर आल्यानंतर खळबळ

Viral Video: 'बॉम्बे पंजाबच्या खूप मागे... ' शिवम दुबेचा पतंग कापत अभिषेक शर्माने उडवली खिल्ली

Latest Marathi News Live Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, शेकडो किलो पनीर जप्त

Pune FDA Action : पुण्यात चार ट्रक संशयित खवा, पनीर जप्त; एफडीएची गणेशोत्सवापूर्वी मोठी कारवाई!

Kolhapur Infrastructure: टोपचा उड्डाणपूल अडकला ठेकेदारांच्या वादात; सहापदरी कामाकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष; नव्या निविदेमुळे काम आणखी लांबणार

SCROLL FOR NEXT