sakal
पुणे

अभिमानास्पद! लष्कर व हवाईदल प्रमुखपदी मराठी अधिकारी

मराठी मनाला अभिमान वाटावा असा कालचा दिवस. एअर चीफ मार्शल म्हणून विवेक राम चौधरी यांनी हवाईदलाच्या प्रमुखपदाची सुत्रे स्वीकारली. चौधरीसर हे नांदेडचे आहेत.

रमेश वत्रे

केडगाव : मराठी मनाला अभिमान वाटावा असा कालचा दिवस. एअर चीफ मार्शल म्हणून विवेक राम चौधरी यांनी हवाईदलाच्या प्रमुखपदाची सुत्रे स्वीकारली. चौधरीसर हे नांदेडचे आहेत. भारतीय लष्कर व हवाई दलप्रमुखांची सुत्रे आता मराठी माणसांकडे आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला पाहिजे.

भारतीय सैन्य दल हे जगात चौथ्या क्रमांकाचे समजले जाते. भारतीय सिमांच्या संरक्षणाची जबाबदारी हवाईदल, पायदल, नौदल या तीन विभागावर असते. यातील दोन विभागाचे प्रमुख हे आता मराठी आहेत. लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज नरवणे हे काम पहात आहे.

जनरल गोपाळराव बेवूर, जनरल अरूणकुमार वैद्य, जनरल चौधरी, अॅडमिरल जयंत नाडकर्णी, अॅडमिरल करमरकर, एअर चीफ मार्शल लक्ष्मणराव कात्रे, एअर चीफ मार्शल ऋषीकेश मुळगावकर, लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात यांच्या थोर परंपरेत चौधरीसर व नरवणेसर यांनी मानचा तुरा रोवला आहे. अशा पराक्रमी सर्वोच्य मराठी सेनाधिका-यांची यादी मोठी आहे. आता प्रतिक्षा आहे ॲडमिरलपदावर मराठी माणूस विराजमान होण्याची.

आज यशवंतराव असते तर...

तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एक खंत बोलून दाखवली होती. ''महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( NDA) आहे परंतु NDA मध्ये महाराष्ट्र दिसत नाही.'' त्यानंतरची नरवणेसर आणि चौधरीसर यांची पिढी आहे. या पदांवर पोहचताना अनेक दिव्य पार करावी लागतात. अखेर राष्ट्रपती महोदयांच्या सहीने या पदांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होते. अलिकडच्या काळात एनडीए व युपीएससीमधील मराठी तरूणांचा टक्का वाढला ही मराठीजनांसाठी समाधानाची बाब आहे.

या निमित्ताने दौंड तालुक्याचा विचार केला तर आणखी दोन दिग्गज मराठी सेनाधिका-यांचा उल्लेख केल्याशिवाय रहावत नाही. निवृत्तीनंतर या दोन दिग्गजांनी शेती करण्यासाठी दौंडच्या मातीला प्राधान्य दिले. स्व. मेजर रामराव राघोबा राणे, आलेगाव (परमवीर चक्र विजेते), लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, भांडगाव (सर्जिकल स्ट्राईक मोहिमेचे प्रमुख). या दोघांनीही भारतीय लष्करात एक अविस्मरणीय कामगिरी करत एक इतिहास रचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime:'थेऊर येथील विवाह सोहळ्यात १४ लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी'; पुणे सोलापूर रोडवरील मंगल कार्यालये बनली चोरीचे अड्डे !

Gadchiroli News : १०० कमांडो, ५०० पोलिस अधिकारी अन् कंत्राटदाराची मेहनत; गडचिरोलीच्या दुर्गम भागात २४ तासांत उभारलं पोलीस मदत केंद्र...

Satara Accident: मुगाव फाट्यावरील अपघातात एक युवक ठार, अन्य जखमी; स्विफ्ट कार व मोटारसायकलचा भीषण धडक

Belgaum Theft : बसप्रवास पडला १८ लाखांचा; गर्दीचा फायदा घेत प्रवासी महिलेचे सोन्याचे दागिने चोरले; बेळगावमध्ये खळबळ!

Rupali Chakankar: कोपरगावात गुलाल आपलाच : रुपाली चाकणकर; पालिका निवडणुकीसाठी आमचे येणे केवळ औपचारिकता

SCROLL FOR NEXT