Loudspeeker_Mosque 
पुणे

Video : मुस्लीम बांधवांनो, पोलीस उपनिरीक्षकांनी मशिदीच्या भोंग्यातून केलंय 'हे' आवाहन!

सकाळ वृत्तसेवा

खडकी बाजार : संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशावरही कोरोनाचे सावट आहे. अशा परिस्तिथीमध्ये सर्व भारतीय सण साधेपणाने साजरे होत आहेत. सोमवारी (ता.२५) रमजान ईद आहे. त्यामुळे खडकी जामा मशीद ट्रस्टने यंदाची ईद साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरीश ठाकूर यांनी मशिदीत जाऊन मुस्लिम बांधवाना आवाहन केले. ईदमुळे अनेक मुस्लीम बांधव नमाज पठण करण्यासाठी मशिदीत येऊ शकतात. गर्दी झाल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इदगाह मैदानावर जाऊन नमाज अदा करण्याऐवजी घरी नमाज पठण करावे, असा संदेश ठाकूर यांनी मशिदीच्या भोंगातून दिला. तसेच त्यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छाही दिल्या.

खडकी परिसरात जामा मशीद आणि मदिना मशीद या दोन मोठ्या मशिदी आहेत. तसेच महादेववाडी आणि दर्गा वसाहत येथेही मशीद आहेत. या सर्व मशिदीच्या ट्रस्टींनी घरातूनच नमाज पठण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: एक दिवस हजेरी लावून विश्रांती... पुण्यातील पाऊस कुठं हरवला, राज्यात काय परिस्थिती?

हौस ऑफ बांबू : खादाड पत्रकारांचे मेन्यूकार्ड..!

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

संत एकनाथ महाराज : अभ्यासे सार्थक करी काळु

सोलापुरात वाढल्या चोरी, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी! रात्री ११ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत १०० पोलिस अधिकारी-अंमलदारांचे कोम्बिंग ऑपरेशन, वाचा...

SCROLL FOR NEXT