Corona-Virus 
पुणे

पुण्यातली रुग्णांची संख्या थांबण्याची चिन्हं नाहीत; पुन्हा रुग्ण वाढू लागले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णाचा रोजचा आकडा अजूनही शंभरीच्याच आसपास राहू लागला असून, शुक्रवारी (ता.१) दिवसभरात ९१ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आतापर्यंत दीड हजाराहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. तर दिवसभरात सहा जणांचा बळी गेल्याने मृतांचा आकडा ९२ पर्यंत गेला आहे.

आतापर्यंत ५१ लोक कोरोनामुक्त झाले असून विविध रुग्णालयांत ११९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे शहरात या आठवड्यात रोज सरासरी ८५ ते ते ९५ रुग्ण सापडत आहेत. तर मृतांचे प्रमाण मात्र कमी झाले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

माळवाडीतील ८० वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे त्यांना २९ एप्रिलला रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा १ मे रोजी मृत्यू झाला. या महिलेला न्यूमोनिया होता. ताडीवाला रस्ता भागातील ६५ वर्षाच्या पुरुषाचा बळी गेला असून, २२ एप्रिलपासून ते रुग्णालयांत होते. याच भागातील ७३ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या तिन्ही मृतांना अन्य आजार होते.

शहरातील सुमारे ९ हजार ८८९ जणांची तपासणी केली असता; त्यापैकी ८ हजार ३९६ लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर, १ हजार ६११ जण कोरोनाबाधित होते. त्यापैकी ३२५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजघडीला १ हजार १९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Restrictions: मुंबईकरांनी लक्ष द्या! दोन आठवडे जमावबंदी लागू होणार; कधीपासून आणि का? काय बंद, काय सुरू राहणार?

Shubman Gill: रोहितचं कर्णधारपद गेलं अन् टीम इंडियाची लागली उतरती कळा? गिल-गंभीरांच्या काळातील धक्कादायक आकडेवारी समोर

Delhi Student Agitation : दिल्ली मध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ अंबड शहरात भव्य निषेध मोर्चा; उपविभागीय अधिकारी यांना दिले मागण्यांचे निवेदन

Manchar News : मंचर दूध भेसळ प्रकरणातील फरारी आरोपींना त्वरित अटक करा; शिवसेनेचे नेते रमेश येवले यांची मागणी

अंगावर कंडोम फेकले, चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला अन्...; महिला ट्रेनी IPSचे धक्कादायक आरोप; सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT