Corona Test sakal media
पुणे

पुणे : तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पायाभूत सुविधांचा आढावा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा केंद्र शासनाने दिलेला असताना कोरोनाच्या प्रतिबंधासाठी महापालिकेच्या पायाभूत सुविधांचा आढावा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज (ता. ३०) घेतला.

ब्रीजमोहन पाटील

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा केंद्र शासनाने दिलेला असताना कोरोनाच्या प्रतिबंधासाठी महापालिकेच्या पायाभूत सुविधांचा आढावा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज (ता. ३०) घेतला. रुग्णालये, ऑक्सिजन प्लांट यांची उर्वरित कामे गतीने पूर्ण करा. अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात एका दिवसात सात हजार रुग्ण आढळले होते, त्यावेळी शहरातील खासगी तसेच महापालिकेच्या सर्व रुग्णालयात बेड, ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली होती. त्यातच ऑक्सिजनचा तुटवडा कमी झाल्याने आणीबाणीची होती. रुग्णांना योग्य पद्धतीने उपचार देऊन त्यांचे प्राण वाचविण्यासाठी प्रशासनाची चांगलीच दमछाक झालेली होती.

केंद्र शासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे, त्यासाठी शहरातील सुविधा सज्ज ठेवाव्या लागणार आहेत. याकडे महापालिका प्रशासनाने आज आढावा बैठक घेतली. राजीव गांधी रुग्णालय, अण्णासाहेब मगर रुग्णालय येथील कामाचा आढावा आयुक्तांनी घेतला व उर्वरित कामे गतीने पूर्ण करा असे सांगण्यात आले.

लहान मुलांची काळजी घ्यावी, त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, महापालिकेच्या ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण करा, ज्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे तेथे कोरोनाची चाचणी करण्याचे प्रमाण वाढवा अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच रुग्णसंख्या वाढत गेल्यास सीओईपी जम्बो रुग्णालय सुरू करण्याचा विचार केला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय संघातून वगळले, म्हणून Rinku Singh पेटला! २४० च्या स्ट्राईक रेटने स्फोटक खेळी; समीर रिझवी, माधव कौशिक यांचेही अर्धशतक

Year End 2025: 'हे' हेल्थ ट्रेंड राहिले सर्वाधिक चर्चेत, जाणून घ्या काय आहे खास

Latest Marathi News Live Update : दत्तजयंती, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या संगमाला सुपरमून, आकाशात दुर्मिळ असा तेजस्वी चंद्र दिसणार

Kolhapur News : दौलत-अथर्व कारखान्याकडून उसाला ३५०० दर जाहीर; स्वाभिमानींच्या सातत्यपूर्ण लढ्याला मिळाला यश

Indigo Emergency Landing : अहमदाबाद विमानतळावर 'इंडिगो' विमानाचे आपत्कालीन लँडिंग; बॉम्बच्या धमकीने उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT