Pune Accident News 
पुणे

Pune Accident News: पुण्यात मद्यधुंद कारचालकाने 4 वाहनांना दिली धडक; तरुणीचा जागीच मृत्यू

Sandip Kapde

Pune Accident News: पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवले आहे. भरधाव कार चालवून दुचाकीला धडक दिली या धडकेत हवेत उडून आदळल्याने दुचाकी वरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री पुण्यात खराडी परिसरात घडला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी कारचालक आरोपी भव्य अशोक नामदेव याला अटक केली आहे. 

पोलिसांनी सोनाली अविनाश रोकडे (२६) असे मृत  तरुणीची ओळख पटवली आहे. तिचे नातेवाईक अभिषेक गायकवाड (२९) याप्रकरणी या प्रकरणी चंदन नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींवर  कलम २७९, ३३८, ३०४ (अ), ४२७ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. (Pune News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली एका मेडिकल दुकानात काम करत होती. अभिषेक गायकवाड तिला दुचाकीवरून घरी सोडत असताना मागून आलेल्या एका कारने त्यांना धडक दिली.

कारने दुचाकीला फरफटत नेल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे सोनालीला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला तर गायकवाड यांनाही काही जखमा झाल्या. दुचाकी खाली आल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या आणखी तीन वाहनांना धडकली, असे पोलिसांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT