Pune truck accident pothole video esakal
पुणे

Pune Accident CCTV Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

Pune truck accident viral video : मैलापाणी वाहिनी दुरुस्ती करण्यासाठी गेलेला ट्रक 25 फूट खड्ड्यात पडला आहे. शहरातल्या समाधान चौकामध्ये ही घटना घडली आहे. घटनेत जीवितहानी झालेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

Pune News: पुण्यातला समाधान चौकामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक अख्खा ट्रक खड्डयामध्ये गेला आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नसली तरी संपूर्ण ट्रक खड्ड्यात गेल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.

शहराच्या मध्यवर्ती भागातील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारात मैलापाणी वाहिनी दुरूस्तीसाठी गेलेला ट्रक अचानक 25 फुट खड्डा पडून त्यामध्ये गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

बेलबाग चौकाजवळच सिटी पोस्ट कार्यालय आहे. या परिसरात मैलापाणी वाहिन्यांबाबत तक्रारी आल्याने महापालिकेकडून संबंधित वाहिन्या दुरूस्तीचे काम सुरू होते. शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास महापालिकेची मैलापाणी वाहिनी दुरूस्तीसाठी ठेकेदाराचा ट्रक व कामगार सिटी पोस्ट कार्यालयात पोचले. त्यांनी तेथील चेंबरमध्ये काम करण्यास सुरवात केली. त्याचवेळी ट्रक थांबलेल्या ठिकाणची जमीन खचली, काही वेळातच ट्रक खाली मोठा खड्डा तयार होऊन, त्यामध्ये ट्रक जमीनीत खेचला गेला, ट्रकचा केबीनचा भाग वगळता संपूर्ण ट्रक जमीनीत गाडला गेला.

चालकाने ट्रकमधून बाहेर उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला. ट्रक खड्ड्यात गेल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साठू लागले. याबाबतची माहिती अग्निशामक दलास मिळाली. त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान तेथे दाखल झाले. त्यांनी खड्ड्यात अडकलेला ट्रक काढण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी सुहास जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirdi News:'शिर्डीतील पाहुण्यांची काश्मिरी लग्नास हजेरी'; पारंपरिक सोहळ्यात तीन दिवस घेतला पाहुणचार, आदरातिथ्याने भारावले

Ajit Pawar : अजित पवारांच्या बनावट पत्रावर सुचविली एक कोटीची कामे; जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रावर बनावट स्वाक्षरी!

Latest Marathi News Live Update : लाचखोरी प्रकरणी नायगाव पंचायत समितीचे 9 गृहनिर्माण अभियंता कार्यमुक्त

Women's World Cup Semifinal: लक्ष्य एक; पण अडचणी अनेक, महिला विश्वकरंडक, भारतासमोर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान

MLA Amol Khatal: पर्यटनासाठी २ कोटींच्या कामांना मान्यता: आमदार अमोल खताळ; तालुक्याला नवचैतन्य मिळणार

SCROLL FOR NEXT