पुणे

Pune Accident: डंपर अपघातात बळी गेल्यास चालकासह मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, पोलिसांचा इशारा

Wagholi Latest News: पुणे जिल्हा खाण व क्रशर संघटनेचे रामदास दाभाडे, युवराज दळवी, १० ते १२ मालक व ३० ते ४० चालक उपस्थित होते.

सकाळ वृत्तसेवा

latest Pune News: यापुढे डंपर अपघातात कोणाचा बळी गेल्यास चालकासह डंपर मालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला जाईल. असा इशारा लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी दिला.

                           वाघोलीत डंपर अपघातात १२ दिवसात दोन बळी गेले. या पार्श्वभूमीवर खाण क्रशर व डंपर मालक व चालक यांची बैठक लोणीकंद पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती.

या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी लोणीकंद वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, पुणे जिल्हा खाण व क्रशर संघटनेचे रामदास दाभाडे, युवराज दळवी, १० ते १२ मालक व ३० ते ४० चालक उपस्थित होते.

रेजितवाड पुढे म्हणाले, प्रादेशिक परिवहन नियमानुसार डंपर असावेत. चालकांनी दारू पिवून वाहन चालवू नये. तसे कोणी आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही. आपले वाहन आपली जबाबदारी या भावनेने चालवा. दोन पैशासाठी भरघाव वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरू नका. ज्याच्या घरचा मृत्यू होतो त्याचे दुःख त्यालाच कळते. जबाबदारीने वाहन चालवा.

सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव म्हणाले, बंदी काळात डंपर अजिबात रस्त्यावर आणू नका. असेच अपघात होत राहिल्यास एके दिवशी उद्रेक होवून व्यवसाय बंद करण्याची वेळ तुमच्यावर येईल. यामुळे नियम न तोडता वाहतूक करा. यापुढे बंदी व नियम तोडणाऱ्यांची अजिबात गय करणार नाही.

संघटनेची कारवाईची मागणी

कोणताही डंपर मालक बेदारकार पणे डंपर चालव असे चालकाला सांगत नाही. चालक आघावपणा करतात. नियम व बंदी मोडणाऱ्यांवर डंपरवर कडक कारवाई करा. असे पुणे जिल्हा खाण व क्रशर संघटनेचे रामदास दाभाडे व युवराज दळवी यांनी सांगितले. संघटनेने १००

बॅरिकेटस् व पाच ट्रॅफिक वॉर्डन वाहतूक विभागाला दिले आहेत. आमची प्रमुख चौकात कॅमेरे बसवून द्यायची तयारी आहे. असे ही दाभाडे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: कोकण-मुंबई पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट, वातावरण कसं राहणार? हवामान तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबईला ये... नाना पाटेकरांमुळे इंडस्ट्रीमध्ये आले मकरंद अनासपुरे; जुनी आठवण सांगत म्हणाले- त्या दिवशी...

Suryakumar Yadav: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी MS Dhoni ला कॉल; सूर्याने सांगितला, 'कॅप्टन कूल'चा सल्ला कसा कामी आला

Mumbai Hotels Closed: मुंबईतील सर्व हॉटेल्स बंद होणार? गॅस तुटवड्यामुळे मोठा फटका, २० टक्के हॉटेल्सना टाळे

शार्दूलची तिसरी पत्नी झाल्यामुळे तुझ्यावर टीका झाली... नेहा पेंडसे थेट उत्तर देत म्हणाली- काही लोकांना वाटतं की...

SCROLL FOR NEXT