Pune accident esakal
पुणे

Pune Accident : दुर्दैवी घटना ; चारचाकीने धडक दिल्याने दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

Pune accident : घरुन शाळेमध्ये जाण्यासाठी शाळकरी मुले निघाली होती

मिलिंद संगई, बारामती.

Pune News : बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार येथे भरधाव वेगातील चारचाकीने दहावीत शिकत असलेल्या तीन शाळकरी मुलांना सोमवारी (ता. 4) सकाळी सव्वानऊच्या सुमारास धडक दिली.

या अपघातात ओंकार संतोष खांडेकर व रुपेश अमोल खांडेकर ही दोन शाळकरी मुलं मृत्यूमुखी पडली. या अपघातात संस्कार संतोष खांडेकर हा देखील गंभीर जखमी झाला आहे. संस्कार हा पाचवीमध्ये शिकत आहे.

आज सकाळी नेहमीप्रमाणे घरुन शाळेमध्ये जाण्यासाठी ही तिन्ही शाळकरी मुले निघाली होती. जळगाव कडेपठार गावामध्ये पुणे बारामती रस्त्यावर मोरगावकडून बारामतीकडे निघालेल्या ह्युंडाई कंपनीच्या चार चाकीने (गाडी क्रमांक एमएच 24- सी- 8041) शाळेकडे निघालेल्या तिन्ही शाळकरी मुलांना जोरदार धडक दिली.

(Latest Marathi News)

या नंतर मोर्चाच्या पोलिस बंदोबस्तावर असलेल्या प्रवीण वायसे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे व अमोल राऊत या पोलिस कर्मचा-यांनी त्यांच्याच खाजगी गाडीतून बारामतीतील गावडे हॉस्पिटलमध्ये तिन्ही मुलांना नेले, मात्र त्या पैकी ओंकार खांडेकर व रुपेश खांडेकर यांचा मृत्यू झाला होता. संस्कार यास गिरीराज रुग्णालयाच उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या तिन्ही मुलांना या गाडीने पाठीमागून येऊन धडक दिली व त्या नंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वाहनाला ही गाडी जाऊन धडकली. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Commonwealth Para Athletics: तोरणडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेतील दिलीप गावितची ग्लास्गो राष्ट्रकुल पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णभरारी

Ambad Vegetable Market: अंबडच्या आठवडी बाजारात पावसाने भाजीपाल्याची मोठी नासाडी; शेतकरी‑विक्रेते बेभाव विक्रीला मजबूर

SCROLL FOR NEXT