Pune mangur fish Sakal
पुणे

Pune : बेकायदेशीर मांगुर मासा वाहतुकीवर कारवाई; जवळपास 2 टन मांगुर मासे केले नष्ट

वाहन मालकासह चालकावर गुन्हा दाखल

संतोष आटोळे

इंदापूर - येथे मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या व शासनाने बंदी घातलेल्या मांगुर माश्याच्या बेकायदेशीर वाहतुकीवरइंदापूर पोलिसांनी कारवाई केलेल्या वाहन चालक व मालकावर मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला.या कारवाई मध्ये मिळून आलेल्या याबाबत 1 हजार 800 किलो मांगुर मासा शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्यात आला.

याबाबत मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी किरण माधवराव वाघमारे यांनी इंदापुर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुरुप इंदापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील व त्यांच्या पथकाने राजवडी ब्रिज (ता.इंदापुर) येथे एक संशियीत लाल रंगाचा आयशर (क्रं. MH 42 BF 5995) ही गाडी थांबवुन त्या गाडीची पाहणी केली असता त्या गाडी मध्ये मासे असलेचे दिसुन आले म्हणुन सदरची गाडी पुढील चौकशी कामी ताब्यात घेवुन इंदापुर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आली आहे.

त्यानंतर मत्स्य व्यवसाय पुणे विभागाचे अधिकारी यांनी माशांची पाहणी केली असता त्यामध्ये राष्ट्रीय हरितलवाद नवी दिल्ली यांनी प्रतिंबधीत केलेल्या मांगुर या जातीचे असल्याचे दिसुन आले.त्यानुरूप पंचनामा करण्यात आला.

त्यानंतर आयशेर टेम्पोमध्ये असलेले प्रतिंबधीत मांगुर मासे हे इंदापुर नगरपरीषद हददीतील कचरा डेपो येथे शास्त्रीय पध्दतीने नष्ट करण्यात आला. सदरचा टेपो हा इंदापुर पोलीस यांच्या ताब्यात देत चालक व मालक यांचेविरुदध कायदेशीर तक्रार देण्यात आली. या कारवाई मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी किरण वाघमारे, बी.एस.पाटील, आर. आर.राठोड, शुभम कोमरेवार यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT