पुणे

पुण्यात पुन्हा तीन आकडी रुग्णसंख्या; रविवारी लसीकरण सुरु

विनायक होगाडे

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून तीन आकडी रुग्णसंख्या सापडत आहे, ही मोठी दिलाशाची बाब आहे. काल पुणे शहरात नव्याने ९७३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती तर पुणे शहरात आज नव्याने ८४० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ६४ हजार ९१६ इतकी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार ९६८ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या १२ हजार ३३० रुग्णांपैकी १,३०९ रुग्ण गंभीर तर ४,१३१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात ११ हजार ३८० नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २४ लाख २७ हजार ३८० इतकी झाली आहे. शहरातील १ हजार ९४९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ४४ हजार ६१८ झाली आहे.

शासनाकडून महापालिकेला कोव्हीशील्ड लसीचे १३ हजार डोस उपलब्ध झाले असून उद्या (रविवारी) महापालिकेच्या ७० केंद्रांवर ४५ वयाच्या पुढील नागरिकांसाठी लसीकरण होणार आहे, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. तसेच शहरातील काही खासगी रुग्णालयांनी थेट कंपनीकडूनच लस खरेदी केलेली असल्याने तेथेही लसीकरण सुरू असेल. केंद्र शासनाने १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाला परवानगी दिली असली तरी, लस उपलब्ध नसल्याने सध्या ४५ वयाच्या पुढील नागरिकांच्या पहिल्या व दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात आहे. महापालिकेला मंगळवारी (ता. १८) कोव्हीशील्डचे फक्त साडे सात हजार व बुधवारी अडीच हजार कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध झाले. त्यानंतर दोन दिवस लसीकरण झाले. त्यानंतर शासनाकडून लस उपलब्ध न झाल्याने शुक्रवार व शनिवारी महापालिकेचे सर्व लसीकरण केंद्र बंद होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT