पुणे

Ahmednagar Murder Mystery : मुलाच्या मृत्यूच्या रागातून संपूर्ण कुटुंब संपवले, ७ जणांच्या हत्याकांडाबद्दल नवा खुलासा

भीमा नदी पात्रात सापडलेल्या सात मृतदेहांसंदर्भात आता नवी माहिती समोर

सकाळ डिजिटल टीम

भीमा नदी पात्रात सापडलेल्या सात मृतदेहांसंदर्भात आता नवी माहिती समोर आली आहे. आत्महत्या नसून त्यांची हत्या केली असल्याची माहिती काही तासांपूर्वी समोर आली. महाराष्ट्रातील पुण्यात एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रथम माहितीनुसार आत्महत्या असल्याचे बोलले जात होते. मात्र, आत्महत्या नव्हे तर घातपात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, मुलाच्या मृत्यूच्या रागातून संपूर्ण कुटुंब संपवल्याचा कट आरोपीने रचला होता. पोलिस अधीक्षक अंकित गोयाल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या हत्येप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

अशोक कल्याण पवार ( वय ६९ ), शाम कल्याण पवार ( वय ३५ ), शंकर कल्याण पवार ( वय ३७ ) प्रकाश कल्याण पवार ( वय २४ ), आरोपींची बहिण कांताबाई सर्जेराव जाधव ( वय ४५ सर्व रा. ढवळेमळा, निघोज, ता. पारनेर, जि.नगर ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

या घटनेमध्ये कोणतीही करणी किंवा जादूटोणा यांचा समावेश नाही. मुलाच्या मृत्यूच्या रागातून या हत्येचा कट रचला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कलम 302 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहन उत्तम पवार ( वय ४५ ) संगिता उर्फ शहाबाई मोहन पवार ( वय ४० दोघेही  रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड) शाम पंडीत फुलवरे ( वय २८ ), राणी शाम फुलवरे ( वय २४ ) रितेश उर्फ भैय्या ( वय ७ ), छोटू शाम फुलवरे ( वय ५ ) कृष्णा शाम फुलवरे ( वय ३, चौघेही रा. हातोला, ता. वाशी, जि.उस्मानाबाद ) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

मोहन पवार हे शाम फुलवरे यांचे सासरे आहेत. अनैतिक संबंध किंवा अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे. आरोपी व मयत मोहन पवार हे चुलत भाऊ आहेत. पवार व फुलवरे या दाम्पत्यांचा यवत येथे काल अंत्यविधी करण्यात आला. आरोपी व मयत सर्वजण निघोज ( ता.पारनेर ) येथे राहत होते. तेथे ते मजुरी काम करत असत.

हत्या कशी करण्यात आली?

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अशोक पवार, याचा मुलगा धनंजय पवार याचा काही महिन्यांपुर्वी वाघोली येथे अपघातात मृत्यू झाला होता. या मृत्यूस मयत मोहन पवार व त्याचा मुलगा अनिल पवार कारणीभूत असल्याचा संशय आरोपींना होता.

धनंजयच्या मृत्यूचा राग आरोपींच्या डोक्यात होता.  या कारणावरून सुड घेण्याच्या उद्देशाने आरोपींनी मोहन पवार व त्यांच्या कुटुंबियांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी मिळण्याची शक्यता आहे.

याबाबत आणखी काही उद्देश आहे का, कट कसा रचला, कुठे रचला याबाबत आम्ही तपास करत आहे. अशी माहिती अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medha Kulkarni Hospitalized : भाजप खासदार मेधा कुलकर्णी रूग्णालयात दाखल ; काही दिवस संपर्कात नसणार!

Uddhav Thackeray : दगाबाज रे.. सरकार पॅकेजचे काय झाले? उद्धव ठाकरे यांनी भुम, परंडा, वाशी या भागाचा केला पाहणी दौरा

ट्रेनच्या शौचालयात ‘प्रेम’ व्यक्त करणाऱ्यांनो सावधान! आता कुणाचा नंबर किंवा नाव लिहिलंत तर...; रेल्वे प्रशासनाचा थेट इशारा

पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग... एसटी पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले होणार! सुविधा कुठे उपलब्ध असणार?

Vegetable Vendor Wins 11 crore Lottery Video : नशीब असावं तर असं! मित्राच्या पैशाने लॉटरीचं तिकीट खरेदी केलेल्या भाजी विक्रेत्याने जिंकलं तब्बल ११ कोटींचं बक्षीस

SCROLL FOR NEXT