Ahmednagar Murder Mystery  Esakal
पुणे

Ahmednagar Murder Mystery : हत्येमागे करणी, जादूटोणा यांचा काही संबध नाही; पोलिसांनी दिली माहिती

मुलाच्या मृत्यूच्या रागातून संपूर्ण कुटुंब संपवले, ७ जणांच्या हत्याकांडाबद्दल नवा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

भीमा नदी पात्रात सापडलेल्या सात मृतदेहांसंदर्भात आता नवी माहिती समोर आली आहे. आत्महत्या नसून त्यांची हत्या केली असल्याची माहिती काही तासांपूर्वी समोर आली. महाराष्ट्रातील पुण्यात एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रथम माहितीनुसार आत्महत्या असल्याचे बोलले जात होते. मात्र, आत्महत्या नव्हे तर घातपात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, मुलाच्या मृत्यूच्या रागातून संपूर्ण कुटुंब संपवल्याचा कट आरोपीने रचला होता. पोलिस अधीक्षक अंकित गोयाल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या हत्येप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

या घटनेमध्ये करणी आणि जादूटोणा केल्याप्रकरणी हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर याबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, या हत्येमागे कोणताही जादूटोणा करणी याचा काही संबध नाही. सध्या तरी मुलाच्या मृत्यूच्या रागातून संपूर्ण कुटुंब संपवल्याचा कट आरोपीने रचला याबाबतची माहिती समोर आली आहे. घटनेत आणखी कोणाचा हात आहेत हे तपासात उघड होईल. आत्तापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेमध्ये कोणतीही करणी किंवा जादूटोणा यांचा समावेश नाही. मुलाच्या मृत्यूच्या रागातून या हत्येचा कट रचला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कलम 302 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या ग्रामीण भागातील पारगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपत्रात एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळून आले होते. प्राथमिक तपासात हे सर्व बुडून मृत्यू झाल्याचे दिसत असून पोलीस याचा तपास केला असता करणी प्रकरणी हत्या करण्यात आली आहे.

हत्या कशी करण्यात आली?

मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातुन हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मोहन पवार त्यांच्या कुटूंबासह भीमा नदीत सापडले. त्यांचाच एक मुलगा अमोल पवार त्याच्या एका चुलत भावाबरोबर ज्याचे नाव धनंजय पवार आहे तो गेल्या तीन महिन्यापूर्वी, पेरणी फाटा येथे गेला होता. तो परतताना त्यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये धनंजय पवारचा मृत्यू झाला. परंतु धनंजय पवार यांच्या घरच्यांना संशय आहे की, या सर्व कुटूंबांनी मिळून याच्यावर करणी केली. त्याच्यातून हत्या झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : २०१६ला नीटचा पेपर फुटला तेव्हा PM मोदींना कॉल केलेला; राज ठाकरे काय म्हणाले?

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत मोठा निर्णय! मूळ ढाच्याला बाधा न आणता काम करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे 'पुरातत्त्व'ला निर्देश

Bhiwandi Building Collapse: ढिगाऱ्यातही जिवंत राहिली आईची माया, भिवंडी दुर्घटनेतील 'त्या' प्रसंगाने सर्वांचे डोळे पाणावले; काय घडलं?

Army Major Accident : उंटाला धडकली आर्मी मेजरची भरधाव कार, महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या मेजरचा जागीच मृत्यू, दोन लेफ्टनंट गंभीर जखमी

R. Ashwin: भुवीला पुनरागमनाचा सल्ला, वैभव सूर्यवंशीला डच्चू! 2027 वर्ल्ड कपसाठी अश्विनचा BCCI ला मोठा सल्ला; पाहा कोण IN, कोण OUT

SCROLL FOR NEXT