plane  sakal
पुणे

Pune Airport : ३० विमाने वाढणार, तर प्रवासी १० हजारांनी वाढणार

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ही अडचण ओळखून विमानतळाचा विस्तार करण्याचे ठरविले.त्यासाठी नवीन टर्मिनल बांधण्याचे काम हाती घेतले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीला विद्युत पुरवठा सुरू झाला आहे. सुविधांची चाचणीदेखील यशस्वी ठरली आहे. कामावर पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवून आहे. विमानतळ प्रशासनाने विमानसेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन येत्या आठ ते दहा दिवसांत कार्यालयांचे स्थलांतर नव्या टर्मिनलमध्ये करण्यास सांगितले आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये नवे टर्मिनल वापरात येण्याची शक्यता वाढली आहे.

सध्याच्या टर्मिनलच्या इमारतीची जागा कमी असल्याने विमानांच्या वाहतुकीवर मर्यादा येत होत्या. शिवाय प्रवासी सुविधांना देखील फटका बसत होता. गर्दीच्या हंगामात प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्याचा ताण प्रवासी सुविधेवर पडतो. तसेच सुरक्षा तपासणीपासून (सेक्युरिटी चेक इन) ते बॅगेज बेल्टपर्यंत सर्वच ठिकाणी प्रवाशांच्या रांगा ठरलेल्या. त्यामुळे विमानतळाचा विस्तार होणे आवश्यक होते.

सध्याच्या टर्मिनलचा पुनर्विकास

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ही अडचण ओळखून विमानतळाचा विस्तार करण्याचे ठरविले. त्यासाठी नवीन टर्मिनल बांधण्याचे काम हाती घेतले. सुमारे ५२५ कोटींचा खर्च करून ही भव्य इमारत बांधण्यात आली. पाच एरोब्रिजदेखील जोडण्यात आलेे आहेत.

५१ वर्षांनंतर इमारतीचा विकास

विमानतळाच्या मुख्य इमारतीचे बांधकाम १९७२ मध्ये झाले होते. नंतरच्या काळात सातत्याने डागडुजी करण्यात येत होती. ५१ वर्षांनंतर पहिल्यांदाच इमारतीचा पुनर्विकास केला जाणार आहे. काम झाल्यावर एकाच टर्मिनलच्या दोन इमारतींमधून विमानांची व प्रवाशांची वाहतूक होणार आहे. यातून वर्षाला एक कोटी ९० लाख प्रवाशांची वाहतूक होईल.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सध्या वापरात असलेल्या टर्मिनलच्या इमारतीचा पुनर्विकास करायचे ठरविले आहे. त्यासाठी हे टर्मिनल बंद केले जाणार आहे. त्या वेळी प्रवाशांना जुन्या इमारतीत प्रवेश नसेल. टर्मिनलच्या नव्या इमारतीमधूनच विमानांची वाहतूक सुरू होणार असून प्रवाशांना तिथूनच प्रवेश दिला जाणार आहे.

काय होणार फायदा?

सध्याच्या टर्मिनलमधून ९० विमानांचे उड्डाण व लँडिंगदिवसभरात २० ते २२ हजार प्रवाशांची वाहतूकनवीन टर्मिनलवरून रोज १२० विमानांचे उड्डाण व लँडिंग होणार

पुणे विमानतळ प्रशासनाने सुरवातीला टर्मिनलची जुनी व नवी इमारत एकमेकांना जोडण्याचे ठरविले होते. त्याला हवाई मंत्रालयाने होकारदेखील दर्शविला होता. मात्र आता नियोजनात पुन्हा बदल करण्यात आला आहे. जुन्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे ठरविले आहे.

जेव्हा नव्या इमारतीचा वापर सुरू होईल तेव्हापासून जुनी इमारत बंद केली जाणार आहे. यासाठी आणखी किमान २० ते २५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.दिवसभरात ३२ ते ३३ हजार प्रवाशांची वाहतूक होईल विमानांची संख्या ३०नी तर प्रवाशांची संख्या १० हजारांनी वाढणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT