हेलिकॉप्टर  sakal media
पुणे

विमानतळ बंद म्हणून पुण्यातून हेलिकॉप्टर सेवा सुरू !

लोहगाव विमानतळ १६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्यापासून तब्बल २५ हून अधिक शहरांशी एअर कनेक्टिव्हिटी तुटणार आहे

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : शहरातून अन्य शहरांत विमानाने जाण्यासाठी १६ ऑक्टोबरपासून लोहगाव विमानतळ बंद असला तरी, मुंबईला जाण्यासाठी शहरातून हेलिकॉप्टरची सेवा प्रवाशांना उपलब्ध झाली आहे. अर्थातच त्यासाठी पैसे थोडे जास्त मोजावे लागणार आहे.

लोहगाव विमानतळ १६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्यापासून तब्बल २५ हून अधिक शहरांशी एअर कनेक्टिव्हिटी तुटणार आहे. त्यामुळे विशेषतः उद्योजक, नोकरदार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातून हेलिकॉप्टर सेवा सुरू झाली आहे. खराडी येथून हे हेलिकॉप्टर सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुटेल.

मुंबईत जुहू येथे ४५ मिनिटांत ते पोचेल. तर मुंबईहून ४ वाजून ३० मिनिटांनी हे हेलिकॉप्टर निघून पुण्यात पोचेल. तसेच मुंबईतून सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी हेलिकॉप्टर पुण्यासाठी निघेल. ते हेलिकॉप्टर दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी पुण्यातून मुंबईला निघेल. या हेलिकॉप्टरमध्ये एकाचवेळी ५ प्रवासी प्रवास करू शकतील. प्रवाशाने रिटर्न तिकिट बुक केले तर ते २९ हजार ५०० रुपयांना असेल. एका बाजूचे तिकिट १५ हजार ५०० रुपये असेल. ब्लेड इंडियाच्या संकेतस्थळावर या बाबतचे अधिक तपशील प्रवाशांना उपलब्ध होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT