Business
Business 
पुणे

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काही प्रमाणात विकासाचे चक्र सुरु होतेय

सकाळवृत्तसेवा

पुणे - उद्योग, बांधकामे, महापालिकेची साफईची कामे, मेट्रोची कामे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काही प्रमाणात सुरू झाली आहेत. येत्या दोन दिवसांत सुरू होणाऱ्या उद्योगांची संख्या वाढेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. ही कामे सुरू झाल्यामुळे परप्रांतातील मजूर गावी जाण्याऐवजी येथेच थांबत आहेत. त्यामुळे उद्योग, बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आदींना दिलासा मिळाला आहे. या घडामोडींमुळे थांबलेल्या अर्थक्षेत्राला आता काही प्रमाणात ‘बूस्ट’ मिळू शकेल.

बांधकामांना काही प्रमाणात गती  

  • पुणे व पिंपरी चिंचवडमधील बांधकामांना काही प्रमाणात गती  
  • हिंजवडी परिसरात पोलिस आणि बांधकाम व्यावसायिकांची बैठक 
  • कामगारांची वाहतूक बसमधून करण्याची पोलिसांची सूचना 
  • कर्मचाऱ्यांना दुचाकी किंवा मोटारीतून कामावर पोचण्याची परवानगी देण्याची मागणी 
  • स्टील, सिमेंट, वाळू आदी साहित्याची व्यावसायिकांना प्रतीक्षा 
  • कामे सुरू झाल्यामुळे गावाकडे परतणारा मजूर वर्ग काही प्रमाणात थांबला 
  • पुण्यात बांधकाम सुरू करण्यास महापालिकेच्या परवानगीची गरज नाही मात्र, कळविणे बंधणकारक 

थांबलेली बांधकामे सुरू होण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रकल्पस्थळी आता माणसे पोचू लागली आहेत. एक-दोन दिवसांत सुमारे ४० टक्के बांधकामे होतील. पोलिस, महापालिका व जिल्हा प्रशासन सहकार्य करीत आहे. 
- अखिल अग्रवाल, पदाधिकारी, क्रेडाई

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या काही कामांना सुरूवात 

  • आंबिल ओढ्याची सफाई करण्यास कात्रज आणि नवी पेठेतून सुरूवात    
  • शहरातील ६७० किलोमीटरची पावसाळी गटारे स्वच्छ करण्यास सुरूवात, ४० किलोमीटरची कामे पूर्ण  
  • २४ हजार चेंबरपैकी १० हजार चेंबरची सफाई पूर्ण 
  • शहरातील ३५० किलोमीटर लांबीच्या २३ नाल्यांची सफाई करण्यास सुरूवात 

नाले सफाई, पावसाळी गटारे सफाई आदी कामे सुरू आहेत. रस्त्यांची कामे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. पुढील सूचना आल्यावर ती सुरू होतील. 
- व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख, पुणे महापालिका

मेट्रोच्या कामांना प्रारंभ 

  • मेट्रोची हॅरिस पूल, कासारवाडी, नदी पात्रात मेट्रोच्या कामाला सुरूवात 
  • लोहमार्ग टाकणे, स्पॅन टाकणे, वायरींग आदी कामे होणार 
  • मेट्रोचे सुमारे दोन हजार कामगार पुणे आणि पिंपरीतील आहेत 
  • कामगारांची वाहतूक बसद्वारे होणार 
  • पुणे आणि पिंपरीतील मेट्रोच्या सहा स्थानकांच्या कामांना वेग 
  • रेंजहिल्समध्ये लष्कराकडून जागा मिळविण्यासाठी महामेट्रोचा प्रयत्न सुरू

महापालिकेने कामे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. वाहतूक बंद असल्यामुळे रस्त्यावरील कामे वेगाने सुरू आहेत. मनुष्यबळाची कमतरता अथवा कच्च्या मालाचा पुरवठा, यामध्ये कोणतीही अडचण नाही. 
- हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो

उद्योगांची चाके फिरू लागली 

  • जिल्ह्यात सुमारे ६० हजार उद्योगांना उत्पादन सुरू करण्याचे सरकारचे आवाहन 
  • उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी घेण्याची अट रद्द 
  • चाकण, रांजणगाव, तळेगाव, नगर रस्ता, शिक्रापूर, सणसवाडी, पिरंगुट आदी ठिकाणी काही उद्योग सुरू 
  • गावाकडे परतणारे मनुष्यबळ थांबले, उद्योगांना मिळाला दिलासा
  • कामगारांची वाहतूक बसद्वारे करण्याची पोलिसांची सूचना 
  • पुणे आणि पिंपरी चिंचवड ‘रेड झोन’मध्ये असल्यामुळे उद्योग बंदच
  • अत्यावश्‍यक सेवेशी संबंधित उद्योग पुणे, पिंपरीत सुरू 
  • मालवाहतूक सुरू झाल्याने उद्योगांना कच्चा माल मिळणे शक्‍य

उद्योग सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली. ‘रेड झोन’मध्ये मात्र, उद्योग बंद ठेवावे लागतील. दोन दिवसांत उद्योगांची गाडी काही प्रमाणात रुळावर येऊ शकेल.
- सदाशिव सुरवसे, उद्योग सहसंचालक  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT